हिंदीवरून वादळ

हिंदीवरून वादळ

देशभर हिंदी ही एकच भाषा असावी, या भाजप अध्यक्ष आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या वक्तव्यावर जोरदार प्रतिक्रिया उमटत असून, दक्षिणेतील राज्यांच्या

जम्मू आणि काश्मीरचे विभाजन का केले
युरोपियन युनियनचे नागरिकत्व दुरुस्ती विधेयकावर लक्ष
सर्व बेकायदेशीर स्थलांतरितांना बाहेर हाकलले जाईल – अमित शाह

देशभर हिंदी ही एकच भाषा असावी, या भाजप अध्यक्ष आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या वक्तव्यावर जोरदार प्रतिक्रिया उमटत असून, दक्षिणेतील राज्यांच्या नेत्यांनी उलटे प्रहार करायला सुरुवात केली आहे. त्यात भाजप नेत्यांचाही समावेश आहे.

हिंदी दिवसाच्या निमित्ताने अमित शहा यांनी देशाला जोडण्यासाठी एका भाषेची गरज असून, ते काम सर्वाधिक बोलली जाणारी, हिंदी ही भाषा करू शकते. या स्वरूपाचे ट्वीट केले होते. भाजपचे कार्यकारी अध्यक्ष जे. पी नढ्ढा यांनीही हिंदी हीच जगामध्ये भारताची ओळख असल्याचे म्हंटले होते.

या वक्तव्याचा परिणाम उलटा झाला आहे. भाजपचे कर्नाटकातील मुख्यमंत्री बी.एस. येडीयुरप्पा यांनीच हिंदीला विरोध केला. ते म्हणाले, “कर्नाटकात कन्नड हीच मुख्य भाषा राहील आणि त्यात तडजोड केली जाणार नाही. देशाच्या पातळीवर सर्वच अधिकृत भाषा या समान आहेत.”

काँग्रेस नेते आणि कर्नाटकचे माजी मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी, शहा हे भाषेच्या मुद्द्यावरून तेढ निर्माण करीत असल्याचे वक्तव्य केले.

अभिनेते कमल हसन यांचा एक व्हिडीओ प्रसिध्द झाला आहे. ‘द वायर’ आणि ‘द वायर मराठी’वरून तो प्रसिद्ध करण्यात आला आहे. त्यामध्ये कमल हसन म्हणतात, “हा देश बहुविध संस्कृतीने तयार झाला आहे. त्यावर हल्ला करण्याचा कोणी शहा, सुलतान वा सम्राटाला हक्क नाही. आपण सगळेजण बंगाली असलेले राष्ट्रगीत आनंदाने गातो कारण त्यामध्ये रचनाकाराने, महान कवीने भारतातील सर्व भाषांना सन्मान दिला आहे. पण आमची मातृभाषा तमिळच राहील. भारतीय संस्कृती सर्वसमावेशक आहे, तिला बिघडविण्याचे प्रयत्न करू नका. जलीकत्टूच्या वेळी केवळ निदर्शने झाली होती. भाषेच्या मुद्द्यावर लढाई होईल आणि मला खात्री आहे, की अशी लढाई तामिळनाडू आणि भारताला नको असेल.”

द्रमुक नेते एम. के. स्टालिन यांनीही या वक्तव्यावर जोरदार टीका केली आहे. द्रमुकच्या बैठकीमध्ये या विषयावर चर्चा करण्यात आली आणि येत्या २० सप्टेंबरला राज्यामध्ये निदर्शने करण्याचा निर्णय घेण्यात आला.

केरळचे मुख्यमंत्री पिनराई विजयन म्हणाले, की हा राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा हिंदी अजेंडा आहे. सध्याच्या  देशातील महत्त्वाच्या प्रश्नांना बगल ज्ञासाठी, हा मुद्दा उकरून काढण्यात आला आहे.

भारताची रचना त्रिभाषा सूत्रानुसार करण्यात आली असून, त्याला धक्का लावण्याचा प्रयत्न कोणी करू नये, असे ट्वीट काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी केले आहे.

COMMENTS

WORDPRESS: 0
DISQUS: