९ शहरांमध्ये घरांची विक्री ९.५ टक्क्याने घटली

९ शहरांमध्ये घरांची विक्री ९.५ टक्क्याने घटली

नवी दिल्ली : बाजारातील कमालीच्या मंदीने देशातील ९ प्रमुख शहरांमध्ये जुलै ते सप्टेंबर दरम्यान घरांची विक्री ९.५ टक्क्याने घटली आहे. या तीन महिन्यात या

मोदींच्या ५ ट्रिलियन स्वप्नाला जागतिक परिस्थितीमुळे खीळ?
रुपया नीचांकी पातळीवर
ओला, उबर आणि नया दौर

नवी दिल्ली : बाजारातील कमालीच्या मंदीने देशातील ९ प्रमुख शहरांमध्ये जुलै ते सप्टेंबर दरम्यान घरांची विक्री ९.५ टक्क्याने घटली आहे. या तीन महिन्यात या ९ प्रमुख शहरांमध्ये केवळ ५२,८५५ घरे विकली गेल्याची माहिती गृहबांधणी उद्योगाशी निगडित ‘प्रॉपइक्विटी’च्या अहवालात नमूद करण्यात आली आहे. गेल्या वर्षी याच तीन महिन्यात घरांच्या विक्रीचा आकडा ५८,४६१ इतका होता.

प्रॉपइक्विटीच्या आधी प्रॉपटायगर, एन्रॉक या दोन कंपन्यांनी जुलै ते सप्टेंबर या तिमाहीत घरांची विक्री अनुक्रमे २५ टक्के व १८ टक्क्यांनी घसरल्याची माहिती दिली होती. तसेच जेएलएल इंडियाने एक टक्क्याने विक्री घसरेल असा अंदाज व्यक्त केला होता.

घरांच्या विक्रीत आलेली घट ही आर्थिक मंदी व बाजारात कर्जे उपलब्ध नसल्याने झाली आहे असे मत प्रॉपइक्विटीचे प्रमुख समीर जसूजा यांनी व्यक्त केले आहे.

घराची विक्री मंदावल्याची शहरे खालील प्रमाणे : कंसातील आकडा गेल्या वर्षीची विक्री.

मुंबई : ५,०६३ (६,४९१), २२ टक्के घट

हैदराबाद : ४,२५७ (५,०६७), १६ टक्के घट

कोलकाता : ३,०६९ (३,४८७), १२ टक्के घट

नॉयडा : ९९० (१,११२), ११ टक्के

चेन्नई : ३,०६० (४,०८०), २५ टक्के

याच बरोबर बंगळुरु व ठाण्यातही घरविक्री घटली आहे.

पण गुरुग्राम व पुण्यात घरविक्री वाढली आहे. गुरुग्राममध्ये गेल्या जुलै ते सप्टेंबरमध्ये घरविक्रीचा आकडा १,११२ होता तो १,१९० इतका वाढला तर पुण्यातला १४,५२३ हून १४,६६९ इतका वाढला आहे.

मूळ बातमी

COMMENTS

WORDPRESS: 0
DISQUS: 0