आता देशातल्या ७५ कोरोना हॉटस्पॉट जिल्ह्यांवर लक्ष

आता देशातल्या ७५ कोरोना हॉटस्पॉट जिल्ह्यांवर लक्ष

नवी दिल्ली : कोरोना महासाथीच्या तिसर्या टप्प्यात भारत आला आहे हे अनेक आठवडे सरकार मान्य करत नव्हते पण ९ मे रोजी इंडियन कौन्सिल ऑफ मेडिकल रिसर्चने (आयस

लॉकडाऊन : केंद्राचे पॅकेज आणि तृतीयपंथी समुदाय
१४३ जिल्ह्यांत एकही आयसीयू बेड नाही
कोरोनाचा नवा विषाणू युरोपात पोहोचला

नवी दिल्ली : कोरोना महासाथीच्या तिसर्या टप्प्यात भारत आला आहे हे अनेक आठवडे सरकार मान्य करत नव्हते पण ९ मे रोजी इंडियन कौन्सिल ऑफ मेडिकल रिसर्चने (आयसीएमआर) देशातील ७५ कोरोना बाधित हॉटस्पॉट जिल्ह्यांवर आपले लक्ष केंद्रीत करणार असल्याचे जाहीर केले. देशात कोरोनाचे ६० हजार बाधित रुग्ण सापडल्यानंतर हा निर्णय घेण्यात आला.

२८ मार्चला केंद्रीय आरोग्य खात्याने कोरोनाची साथ मर्यादित असल्याचा दावा केला होता. आणि जे रुग्ण कोरोना बाधित होते ते परदेशातून आले नसल्याचे वा त्यांचा कोरोना रुग्णांशी थेट संपर्क झाला नसल्याचे सांगितले होते.

९ एप्रिलला आयसीएमआरने इंडियन जर्नल ऑफ मेडिकल रिसर्चमध्ये कबूल केले की कोरोनाची साथ देशातील अनेक राज्यात पसरली आहे. या अहवालात देशातल्या १०४ रुग्णांमध्ये ५० रुग्ण कोरोनाचे असून हे रुग्ण परदेशातून आले नसून त्यांचा कोरोना रुग्णाशी थेट संपर्क आला नसल्याचे म्हटले होते. तसेच देशातल्या १५ राज्यातील ३६ जिल्ह्यांमध्ये कोरोनाचा समुदाय प्रसार झाल्याचे नमूद केले होते. त्यानंतर आयसीएमआरने आपल्या चाचण्यांच्या रणनीतीत बदल आणले व अधिक केंद्रीकृत काम करण्यास सुरवात केली.

पण तरीही आयसीएमआरने कोरोनाची साथ समुदाय स्वरुपाची नसल्याचा दावा करण्यास सुरवात केली होती. केंद्रीय आरोग्यमंत्री हर्षवर्धन यांनी देशात कोरोनाचा समुदाय प्रसार झाला नसल्याचेही सांगितले होते.

याच काळात २६ फेब्रुवारीला देशात केवळ ६० कोरोना केसेस असूनही अमेरिकेने त्यांच्याकडे कोरोनाची साथ समुदाय स्वरुपाची असल्याचे जाहीर केले होते.

भारताने ही कबुली न देण्यामागचे एक कारण असे असावे की, त्यावेळी जलद गतीने कोरोना चाचण्या झाल्या नव्हत्या. टेस्टिंग कीटची कमतरता होती.

आता सरकारने अँटिबॉडी चाचणीऐवजी इलिझा चाचणीच्या माध्यमातून कोरोनाच्या साथीचा प्रसार शोधण्याचा निर्णय घेतला आहे. इलिझा चाचणीतून शरीरात घुसलेल्या विषाणूचा मुकाबला करणार्या अँटिबॉडीज लक्षात येतात. आता याचे सर्वेक्षण सरकारकडून होणार आहे. ते बहुधा मे महिन्याच्या तिसर्या आठवड्यापासून सुरू होईल व सुमारे ३० हजार लोकांच्या चाचण्या घेण्यात येतील. यांचे निष्कर्ष केव्हा येतील याची माहिती मात्र अद्याप मिळालेली नाही.

मूळ बातमी

COMMENTS

WORDPRESS: 0
DISQUS: