मोदींशी टीव्हीवर वादविवाद करायला आवडेलः इम्रान खान

मोदींशी टीव्हीवर वादविवाद करायला आवडेलः इम्रान खान

नवी दिल्लीः भारत आणि पाकिस्तानमधील मतभेद दूर करण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी टीव्हीच्या माध्यमातून वादविवाद करायला आवडेल अशी इच्छा पाकिस्त

अमेरिका भेटीतून इम्रानने बरंच कमावलं
पाकिस्तानच्या न्यायाधीशांचे अभिनंदन
इम्रान खान सरकार पडण्याची शक्यता; मित्र पक्षांनी साथ सोडली

नवी दिल्लीः भारत आणि पाकिस्तानमधील मतभेद दूर करण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी टीव्हीच्या माध्यमातून वादविवाद करायला आवडेल अशी इच्छा पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांनी मंगळवारी व्यक्त केली. इम्रान खान रशियाच्या दौऱ्यावर जात असून मॉस्कोला जाण्यापूर्वी त्यांनी रशियाचे सरकारी टेलिव्हिजन नेटवर्क ‘आरटी’ला मुलाखत दिली. या मुलाखतीत त्यांनी भारत-पाक तणाव संपवण्यासाठी मोदींशी टीव्हीच्या माध्यमातून वादविवाद करण्यास आपली तयारी असल्याचे म्हटले.

भारत आणि पाकिस्तानमधील मतभेद चर्चेने सोडवता आले, तर भारतीय उपखंडातील जनतेसाठी ही मोठी गोष्ट असेल. २०१८ मध्ये आपला पक्ष तेहरीक-ए-इन्साफ सत्तेत आला तेव्हा आपण भारताशी तत्काळ संपर्क साधत काश्मीर प्रश्न चर्चेद्वारे सोडवू असे म्हटले होते. पण आपल्या या प्रयत्नाला भारताने कोणताही सकारात्मक प्रतिसाद दिला नाही, असे इम्रान खान म्हणाले.गेल्या दोन दशकांत पहिल्यांदाच पाकिस्तानचे पंतप्रधान रशियाला भेट देत आहेत. आपल्या दोन दिवसांच्या दौऱ्यात इम्रान खान रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांच्याशी चर्चा करतील. या चर्चेत ते क्षेत्रिय व आंतरराष्ट्रीय मुद्द्यांवर चर्चा करणार आहेत.

COMMENTS

WORDPRESS: 0
DISQUS: 0