‘२०१४मध्ये हिंदू कट्टरतावाद्यांची तक्रार नव्हती’

‘२०१४मध्ये हिंदू कट्टरतावाद्यांची तक्रार नव्हती’

८ व ९ मार्च २०१४मध्ये दिल्ली शीख गुरुद्वारा कमिटीने फतेह दिवसाच्या निमित्ताने एक मोठा सोहळा लाल किल्ल्यावर आयोजित केला होता. या सोहळ्याला हजारोंची उपस्थिती होती. लाल किल्ल्याच्या प्रशस्त हिरवळीवर व परिसरात निशाण साहिबचा विजयाचा झेंडा फडकवण्यात आला होता.

प्रजासत्ताक दिनी काही शेतकरी आंदोलकांकडून दिल्लीतल्या लाल किल्ल्यावर शीख धर्माचा झेंडा फडकवल्याबद्दल बरीच चर्चा झाली. मंगळवारी जो झेंडा-ध्वज लाल किल्ल्यावर फडकवण्यात आला तो निशाण साहिबचा होता.

१७८३मध्ये बघेल सिंग, जस्सा सिंग अहलुवालिया व जस्सा सिंग रामगरिया यांच्या नेतृत्वाखालील शीख सैन्याने दिल्ली काबीज केली होती. या ‘दिल्ली फतेह’निमित्त निशाण साहिबचा ध्वज लाल किल्ल्यावर फडकवण्यात आला होता. शीख सैन्याने मुघलांचा पराभव केला होता आणि दिल्लीच्या तख्तावर आरुढ होत सेनापतींनी आपला ध्वज रोवला होता. या विजयाच्या निमित्ताने दिल्लीत हिंदू, मुस्लिम व शीखांकडून मिरवणूक काढली होती. दिल्लीतल्या जनतेने मुघलांपासून आपली सोडवणूक झाली म्हणून या घटनेचे स्वागत केले होते. या एकूण ऐतिहासिक घटनेची तैलचित्रे शीख संग्रहालयात आजही आहेत. त्यावर साहित्य उपलब्ध आहे. सोशल मीडियात यूट्यूबवर व्हीडिओही आहे.

दिल्लीची दादागिरी मोडून काढणे ही पंजाबच्या राजकारणात प्रेरक बाब आहे. अगदी भारत स्वतंत्र झाल्यानंतर अकालींचे राजकारण, विशेषतः शिरोमणी अकाली दलाने (बादल गट) अनेक वर्षे दिल्लीच्या भेदभावाच्या राजकारणाला (काँग्रेस सरकार सर्वाधिक काळ केंद्रात असल्याने) विरोध करत शीख अस्मितेवर भर दिला आहे.

हा इतिहास लक्षात घेतल्यानंतर एका घटनेकडे आपण लक्ष द्यायला हवे. ही घटना फारशी दूर नाही. ८ व ९ मार्च २०१४मध्ये दिल्ली शीख गुरुद्वारा कमिटीने फतेह दिवसच्या निमित्ताने एक मोठा सोहळा लाल किल्ल्यावर आयोजित केला होता. या सोहळ्याला हजारोंची उपस्थिती होती. लाल किल्ल्याच्या प्रशस्त हिरवळीवर व परिसरात निशाण साहिबचा विजयाचा झेंडा फडकवण्यात आला होता. या कार्यक्रमात दिल्लीच्या रस्त्यावर ‘जरनैली’ मिरवणूक काढण्यात आली होती. हजारो शीख समुदायाचे लोक पायी, गाड्यांवरून, घोड्यावरून, हत्तीवरून या मिरवणुकीत सामील झाले होते. काहींनी आपला वेष १८ शतकातील खालसा योद्धांसारखा केला होते. काहींनी ‘गटका’ या पारंपरिक शारिरीक कसरतींचे प्रदर्शनही केले.

दोन दिवस सुरू असलेल्या या सोहळ्यात राज करेगा खालसा, कीर्तन व लंगरचे आयोजन करण्यात आले होते. या फतेह दिवसाचे आयोजन एवढ्या मोठ्या प्रमाणात पहिल्यांदाच करण्यात आले होते. त्यानंतर हा कार्यक्रम दरवर्षी आयोजित केला जातो.

पण २०१४ वर्षी झालेला हा सोहळा लोकांचे लक्ष वेधून घेणारा का ठरला?.

पहिले कारण, फतेह दिवसाचा हा सोहळा आयोजित केला होता तो दिल्ली शीख गुरुद्वार व्यवस्थापन समितीने (डीएसजीएमसी). या समितीवर वर्चस्व आहे ते शिरोमणी अकाली दल (बादल) गटाचे. या गटाने अनेक वर्षे काँग्रेसचे वर्चस्व असलेल्या सरना या गटाकडून डीएसजीएमसीची सत्ता खेचून घेतली आणि या विजयाच्या निमित्ताने त्यांनी दिल्लीतल्या पारंपरिक शत्रूला पहिल्यांदा धूळ चारली होती व त्याचा जल्लोष म्हणून फतेह दिवस दणक्यात साजरा करण्यात आला होता. पंजाबमधील एका पक्षाकडे ही सत्ता आली असे यातून सूचित करायचे होते.

दुसरे कारण, लाल किल्ल्यावरील शीखांचा ध्वज हे विजयाचे प्रतीक समजले जाते. आज लाल किल्लावर फडकला जाणारा तिरंगा हा सार्वभौम सत्तेचे प्रतीक आहे व दरवर्षी स्वातंत्र्यदिनानिमित्त लाल किल्ल्यावर तिरंगा फडकवला जात आहे. या किल्ल्यावरून त्या दिवशी देशाला संबोधून पंतप्रधान भाषण करतात. हे पाहता शीखांचा हा ध्वज शीख सार्वभौमाचा दावा करतो. पण या सार्वभौमाचा अर्थ तिरंग्याची जागा शीखांच्या ध्वजाने घ्यावा अशी नाही.

फतेह दिवसांच्यावेळी शीख समुदाय भारतापासून स्वतःच्या वेगळ्या राष्ट्राची मागणी करत नाही. (जी खलिस्तान चळवळीत होती) उलट या दिवसाच्या निमित्ताने ते भारताच्या इतिहासात आम्ही एक प्रभावशाली गट आहे म्हणून स्वीकारावे असे सांगतात.

२०१५मध्ये डीएसजीएमसीने अशी मागणी केली की, १७८३ साली बघेल सिंग यांच्या नेतृत्वाखालील शीखांनी मुघलांचा पाडाव केला आणि या दिवसापासून भारतीय स्वातंत्र्य चळवळीला सुरूवात झाली. त्यामुळे भारत सरकारने हा दिवस दरवर्षी राष्ट्रीय सण म्हणून साजरा करावा. या मागणीत भारतीय इतिहासात शीखांच्या अभिमानाला जागा द्यावी असे सारासार म्हणणे होते.

फतेह दिवस हा भारतवासियांनी साजरा करावा अशीही त्यामागे भावना होती. त्यामुळे फतेह दिवस हा भारतातील उजव्या कट्टरतावाद्यांना तसा सोयीचा आहे. तसेही उजवे कट्टरतावादी मुस्लिम राजवटीच्या विरोधात आक्रमक राजकीय भूमिका मांडत असतात.

असे असताना अनेक उजव्या कट्टरतावाद्यांनी २६ जानेवारी २०२१ रोजी दिल्लीत जे काही घडले त्यावर टीका-आरोप करणे सुरू केले आहे.

कनिका सिंग, या दिल्लीस्थित इतिहासकार आहेत.

मूळ लेख

COMMENTS