नवी दिल्लीः पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ११ जुलैला सुरू केलेल्या जॉब पोर्टलवर पहिल्या ४० दिवसांत ६९ लाखाहून अधिक स्थलांतरितांनी रोजगार मिळवण्यासाठी आ
नवी दिल्लीः पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ११ जुलैला सुरू केलेल्या जॉब पोर्टलवर पहिल्या ४० दिवसांत ६९ लाखाहून अधिक स्थलांतरितांनी रोजगार मिळवण्यासाठी आपली नोंद केली पण या नोंदणी केलेल्यांपैकी केवळ ७,७०० जणांना रोजगार मिळाला आहे.
इंडियन एक्सप्रेसने दिलेल्या वृत्तानुसार १४ ऑगस्ट ते २१ ऑगस्ट या आठवड्यात या जॉब पोर्टलवर ७ लाखाहून अधिक बेरोजगारांनी नोंदणी केली त्यापैकी केवळ ६९१ जणांना नोकरी मिळाली.
Ministry of Skill Development and Entrepreneurship या खात्याच्या ‘असीम’ या पोर्टलवरील आकडेवारीवरून ही माहिती मिळाली आहे. या पोर्टलवर केवळ स्थलांतरित श्रमिकांची नोंदणी झालेली नसून विविध क्षेत्रात बेरोजगार झालेल्यांनीही रोजगारासाठी नोंदणी केली आहे. यात इलेक्ट्रिशियन, टेक्नेशियन, शिवण कामगार, मशीन ऑपरेटर, फिटर, कुरियर डिलिवरी एक्झिक्युटिव्ह, नर्स, अकाउंट एक्झिक्युटिव्ह, क्लीनर, सेल्स आदींचा समावेश आहे.
या पोर्टलवरील आकडेवारीनुसार कर्नाटक, दिल्ली, हरियाणा, तेलंगण व तमिळनाडू राज्यांमध्ये श्रमिकांची संख्या कमी दिसून आली आहे. मार्चमध्ये लॉकडाऊन जाहीर झाल्यानंतर या राज्यातील उ. प्रदेश, व बिहारमधील श्रमिक आपल्या गावी परतले होते.
असीम पोर्टल गरीब कल्याण रोजगार योजनेंतर्गत जूनमध्ये देशातील ११६ जिल्ह्यांत सुरू करण्यात आले. यामध्ये ५.४ टक्के महिलांचीही नोंद आहे. पोर्टलवर ५१४ कंपन्यांनी नोंदणी केली असून ४४३ कंपन्यांनी २.९२ लाख रोजगारांचा माहिती दिली आहे. त्यापैकी १.४९ लाख जणांना रोजगार मिळाले आहेत.
लॉजिस्टिक्स, हेल्थकेअर, बँकिंग, वित्तीय सेवा, विमा, रिटेल व बांधकाम क्षेत्रांनी या पोर्टलच्या माध्यमातून ७३.४ टक्के रोजगारांची नोंद केली आहे.
रोजगार नोंदणीतील ४२.३ टक्के उ. प्रदेश, महाराष्ट्र, हरियाणा, तमिळनाडू व दिल्ली या राज्यातील बेरोजगार आहेत.
मूळ बातमी

COMMENTS