वादग्रस्त म्यानमारच्या लष्करी परेडला भारत उपस्थित

वादग्रस्त म्यानमारच्या लष्करी परेडला भारत उपस्थित

म्यानमारमध्ये 27 मार्च रोजी प्रस्थापित लष्करशाहीच्या विरोधात निदर्शने करणार्या 90 जणांना ठार लष्कराकडून ठार मारले जात असताना भारताने म्यानमार लष्कराने बोलावलेल्या लष्करी परेडला आपली उपस्थिती लावली होती. दरवर्षी 27 मार्चला म्यानमारचा लष्करी दिवस साजरा केला जातो. या दिवशी निमंत्रित केलेल्या देशांपैकी 8 देशांची उपस्थिती होती. त्यात भारतासह चीन, पाकिस्तान, बांगलादेश, व्हिएतनाम, लाओस व थायलंड हे देश उपस्थित राहिले होते.

एनआरसीवरून सर्व पक्ष असमाधानी
केरळमध्ये १ जूनला मान्सूनचे आगमन
बाबरी मशिदीच्या खाली मंदिर असल्याबाबत पुरातत्ववाद्यांमध्ये मतभेद

नवी दिल्लीः म्यानमारमध्ये 27 मार्च रोजी प्रस्थापित लष्करशाहीच्या विरोधात निदर्शने करणार्या 90 जणांना ठार लष्कराकडून ठार मारले जात असताना भारताने म्यानमार लष्कराने बोलावलेल्या लष्करी परेडला आपली उपस्थिती लावली होती.

दरवर्षी 27 मार्चला म्यानमारचा लष्करी दिवस साजरा केला जातो. या दिवशी निमंत्रित केलेल्या देशांपैकी 8 देशांची उपस्थिती होती. त्यात भारतासह चीन, पाकिस्तान, बांगलादेश, व्हिएतनाम, लाओस व थायलंड हे देश उपस्थित राहिले होते. दुसर्या महायुद्धात जपानच्या लष्कराचे आक्रमण परतावून लावल्याबद्दल म्यानमार आपला लष्करी दिवस साजरा करत असते. म्यानमारचा हा 76 वा लष्करी दिवस होता.

गेल्या 1 फेब्रुवारी 2021मध्ये म्यानमारमधील लोकशाही उलथवून तेथे लष्कराने ताबा घेतला होता. त्यानंतर गेल्या काही दिवसांत लष्करशाहीविरोधात निदर्शने केलेल्यांना थेट ठार मारले जात आहे. हा आकडा एकूण 400 च्या वर इतका झाला असून 27 मार्चला 90 जणांना ठार मारण्यात आले आहे, काही सूत्रांनी हा आकडा 114 इतका दिला आहे.

म्यानमारमध्ये लष्करशाही आल्यानंतर अनेक पाश्चात्य देशांनी म्यानमारचा निषेध केला होता व या देशात लष्करी दिनानिमित्त आपले लष्करी प्रतिनिधी पाठवण्यास नकार दिला होता. पण भारतासह चीन, रशिया, पाकिस्तान या बड्या लष्करी क्षमतेच्या देशांनी या आवाहनाकडे दुर्लक्ष केले. रशियाने तर उपसंरक्षणमंत्र्यांना आपले प्रतिनिधी म्हणून पाठवले आहे. तर अन्य देशांनी आपल्या वकिलातीतील अधिकार्यांना पाठवलेले होते.

भारताने आपला प्रतिनिधी पाठवल्याबद्दल जगातल्या काही लोकशाहीवादी चळवळींकडून आश्चर्य व्यक्त केले जात आहे. भारत ही जगातील सर्वात मोठी लोकशाही देश असताना ज्या देशात लोकशाही चिरडली जाऊन तेथे लष्करशाही आली असताना त्यांच्या समर्थनार्थ भारत कसा आपला प्रतिनिधी पाठवू शकतो असा सवाल करण्यात आला आहे. सोशल मीडियावर भारताच्या या भूमिकेवर टीकाही होताना दिसत आहे. म्यानमारमधीलही काही लोकशाही चळवळींनी भारताच्या भूमिकेवर तीव्र आक्षेप घेतला आहे.

काही भारतीय अधिकार्यानी द वायरला सांगितले की, म्यानमार लष्करी दिवसाचे आमंत्रण स्वीकारू नये, अशी विनंती अमेरिकेने अनेक देशांना केली होती.ती विनंती बहुसंख्य देशांनी मान्य करून तेथे आपले प्रतिनिधी पाठवले नाहीत. म्यानमार लष्करातील एक वरिष्ठ अधिकारी मिन आंग हेलांग यांनी म्यानमारमध्ये लवकरच लोकशाही निवडणुका घेतल्या जातील असे सांगितले होते. पण या निवडणुका केव्हा घेतल्या जाणार याबाबत मात्र अद्याप त्यांनी काही माहिती दिली नाही. लष्कराला निवडणुका हव्या आहेत, व देशाला सुरक्षित ठेवण्यासाठी या निवडणुका घेतल्या जातील असे आमचे मत असल्याचे या हेलांग यांची प्रतिक्रिया होती. हेलांग यांनी देशाला उद्देशून केलेल्या भाषणात लष्कराची भूमिका स्पष्ट केली होती, असे भारतीय अधिकार्याने सांगितले. पण भारताच्या उपस्थितीने काही प्रश्न निर्माण होतील, ही भीती या अधिकार्याने फेटाळली आहे.

आसियान गटात मतमतांतरे

म्यानमार लष्कराच्या शनिवारच्या परेडमध्ये थायलंड, लाओस व व्हिएटनाम हे देश सामील झाले होते पण इंडोनेशिया, मलेशिया व सिंगापूर यांनी या परेडमध्ये सामील होण्यास नकार दिला. या तीनही देशांनी म्यानमारमध्ये तातडीने लोकशाही स्थापन होण्यासाठी बैठक घ्यावी अशी मागणीही केली आहे. इंडोनेशिया व मलेशिया हे आसियान देशाचे एक महत्त्वाचे भागीदार देश असून या दोघांनी गेल्या 2 मार्चला म्यानमारमध्ये लोकशाही स्थापन व्हावी म्हणून चर्चा केली होती.

मूळ बातमी

COMMENTS

WORDPRESS: 0
DISQUS: 0