मोदींचे मौन सुटले; राहुल गांधीचे ५ प्रश्न

मोदींचे मौन सुटले; राहुल गांधीचे ५ प्रश्न

नवी दिल्लीः लडाखमधील गलवान खोर्यात मंगळवारी भारत-चीन दरम्यान झालेल्या हिंसक हाणामारीत २० भारतीय जवान शहीद झाल्यानंतर पहिल्यांदाच पंतप्रधान नरेंद्र मोद

चीन-भारत तणाव चिघळला, २० जवान शहीद
नेपाळच्या दोन्ही सभागृहांची वादग्रस्त नकाशाला मंजुरी
भारत-चीन वादात मध्यस्थीस तयार : डोनाल्ड ट्रम्प

नवी दिल्लीः लडाखमधील गलवान खोर्यात मंगळवारी भारत-चीन दरम्यान झालेल्या हिंसक हाणामारीत २० भारतीय जवान शहीद झाल्यानंतर पहिल्यांदाच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बुधवारी प्रतिक्रिया दिली. आपल्या प्रतिक्रियेत मोदींनी जवानांचे बलिदान व्यर्थ जाणार नाही, भारताच्या दृष्टीने अखंडता, सार्वभौमत्व सर्वोच्च असून त्याचे संरक्षण करण्यासाठी आम्हाला कोणी रोखू शकत नाही, असा इशारा त्यांनी दिला. आमचे जवान मारता मारता शहीद झाले. त्यांचे बलिदान व्यर्थ जाऊ दिले जाणार नाही. भारताच्या एकेक इंच जमिनीचे संरक्षण करू. हा देश सांस्कृतिकदृष्ट्या शांतताप्रिय देश आहे. त्याला चुचकारल्यास योग्य वेळी उत्तर दिले जाईल, असे मोदी म्हणाले.

दरम्यान भारत-चीन तणावाच्या पार्श्वभूमीवर येत्या १९ जूनला मोदींनी सर्वपक्षीय बैठक बोलावली असून या बैठकीत भारत-चीन संबंधात निर्माण झालेल्या सद्य तणावाच्या परिस्थितीवर चर्चा होणार आहे. ही बैठक संध्याकाळी ५ वाजता होणार असून सर्व राजकीय पक्षांच्या अध्यक्षांना त्याचे निमंत्रण पाठवण्यात आले आहे.

राहुल गांधी यांचे सरकारला ५ प्रश्न

दरम्यान, गलवान खोर्यात २० भारतीय जवान शहीद झाल्यानंतर काँग्रेसने सरकारच्या धोरणावर टीका केली आहे. काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी ट्विटरवरून संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांना ५ प्रश्न विचारले आहेत. राजनाथ सिंह यांनी आपल्या ट्विटमध्ये चीनचे नाव न घेता शहीद जवानांना श्रद्धांजली वाहिली होती.

राहुल गांधी यांनी आपल्या ट्विटमध्ये संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांना जर दुःख वाटत असेल तर त्यांनी माझ्या ५ प्रश्नांची उत्तरे द्यावीत असे आवाहन केले.

ट्विटमध्ये राहुल गांधी विचारतात,

तुम्हाला जर खरोखर वेदना होत असेल तर सांगा

  • ट्विटमध्ये चीनचे नाव न घेता तुम्ही भारतीय लष्कराचा का अपमान केला?
  • दोन दिवसानंतर तुम्ही शहीद जवानांचे का सांत्वन केले?
  • जवान शहीद होत असताना तुम्ही का रॅली घेत होता?
  • तुम्ही स्वतः लपून बसले आहात पण तुमचा धार्जिणा मीडिया लष्कराला का जबाबदार धरत आहे?
  • विकली गेलेली प्रसारमाध्यमे सरकारऐवजी लष्कराला का दोषी धरत आहेत?

मूळ बातमी

COMMENTS

WORDPRESS: 0
DISQUS: 0