२०२१मध्ये देशभरात ४९ हत्तींची शिकार

२०२१मध्ये देशभरात ४९ हत्तींची शिकार

नोएडाः गेल्या वर्षी २०२१मध्ये देशात ४९ हत्तींची शिकार करण्यात आली. एका माहिती अधिकार अर्जावरून ही माहिती उघडकीस आली आहे. हत्तींच्या शिकारी संदर्भात ७७

आरोग्य क्षेत्रामधल्या हितसंबंधांचा संघर्ष
शशी थरूर, राजदीप यांची सुप्रीम कोर्टात याचिका
मलिकांचे अंडरवर्ल्डशी संबंध – फडणवीस

नोएडाः गेल्या वर्षी २०२१मध्ये देशात ४९ हत्तींची शिकार करण्यात आली. एका माहिती अधिकार अर्जावरून ही माहिती उघडकीस आली आहे. हत्तींच्या शिकारी संदर्भात ७७ जणांना ताब्यात घेतले असल्याचेही वन्य जीव गुन्हे नियंत्रण शाखा (डब्लूसीसीबी)ने सांगितले. ४९ हत्तींपैकी ९ हत्ती आसामच्या जंगलातील असून प. बंगाल, ओदिशा, तामिळनाडूत प्रत्येकी ८, कर्नाटक व उत्तराखंडात प्रत्येकी ३ हत्तींची शिकार करण्यात आली आहे. त्या व्यतिरिक्त केरळ, अरुणाचल प्रदेशात प्रत्येकी २, राजस्थान, हिमाचल प्रदेश, बिहार, मेघालय, छत्तीसगड व महाराष्ट्रात प्रत्येकी एका हत्तीची शिकार करण्यात आली आहे.

हत्तींच्या हत्येप्रकरणी तामिळनाडूतून १७, आसाममधून १५, ओदिशातून १३, प. बंगालमधून ११, केरळ ५, उत्तराखंड, बिहारमधून प्रत्येकी ४, महाराष्ट्रातून ३, मेघालय, राजस्थानमधून प्रत्येकी दोन व कर्नाटकातून एका व्यक्तीस ताब्यात घेण्यात आले आहे.

प्रोजेक्ट एलिफंट या प्रकल्पांतर्गत २०१७मध्ये हत्तींची गणना झाली होती. त्यानुसार भारतात जगातील सर्वाधिक ३० हजार हत्तींची नोंद झाली होती. टक्केवारीनुसार जगातील एकूण हत्तीपैंकी ६० टक्के हत्ती भारतात आहेत.

हत्तीच्या दाताला व मांसाला आंतरराष्ट्रीय तस्करी बाजारात मागणी असल्याने हत्तींची शिकार केली जाते.

मूळ बातमी

COMMENTS

WORDPRESS: 0
DISQUS: 0