भूक निर्देशांकात भारत पाक-नेपाळच्या मागे

भूक निर्देशांकात भारत पाक-नेपाळच्या मागे

नवी दिल्लीः ११६ देशांच्या भूक निर्देशांक यादीत भारताची घसरण १०१ व्या स्थानावर झाली आहे. गेल्या वर्षी २०२०मध्ये भारताचे स्थान ९४ होते. यंदा ७ स्थानाने

वेश्या व्यवसायातील महिलांसाठी शासनाचा मदतीचा हात
‘सांभर’मधील पक्ष्यांच्या मृत्यूंच्या कारणाबाबत मतभेद
मुंबईत महिलांसाठी ‘निर्भया पथक’ सुरू

नवी दिल्लीः ११६ देशांच्या भूक निर्देशांक यादीत भारताची घसरण १०१ व्या स्थानावर झाली आहे. गेल्या वर्षी २०२०मध्ये भारताचे स्थान ९४ होते. यंदा ७ स्थानाने घसरण झाल्याने भारतातील भूकेची परिस्थिती चिंताजनक असल्याचे वैश्विक भूक निर्देशांक ठरवणार्या वेबसाइटचे म्हणणे आहे. हा निर्देशांक आयर्लंडमधील कन्सर्न वर्ल्डवाइड व जर्मनीतील संस्था वेल्ट हंगर हिल्फ या दोघांनी तयार केला आहे. या दोन संस्थांनी तयार केलेल्या अहवालानुसार भारतापेक्षा पाकिस्तान (९२) व नेपाळमधील (७६) परिस्थिती वर्षभरात सुधारली असून भारताचा वैश्विक भूक निर्देशांकातही घसरण झाली आहे. २०००साली हा निर्देशांक ३८.८ होता तो २०१२ ते २०२१ या काळात २८.८-२७.५ या दरम्यान आला आहे.

भूक निर्देशांक हा अल्पपोषण, कुपोषण, मुलांची वाढ व बालमृत्यू दर यावर मोजला जातो.

भारताचा भूक निर्देशांक कोविड-१९ महासाथीच्या काळात घसरल्याचे या अहवालात नमूद करण्यात आले आहे. देशातील बहुसंख्य जनतेला दोन वेळेचे जेवणही मिळत नाही, लाखो लोक भुकेलेले, कुपोषित असल्याचे या अहवालाचे म्हणणे आहे. या कारणांव्यतिरिक्त जागतिक तापमान बदल, वाढती विषमता, लहान मुलांचे कुपोषण, आर्थिक सोयींची कमतरता यामुळेही भारताची घसरण झाली आहे.

भारताच्या तुलनेत पाकिस्तान(९२), बांगलादेश (७६), नेपाळ (७६), म्यानमार (७१) या शेजारी देशांची आकडेवारी सुधारली असली तरी या देशातील परिस्थिती गंभीरच असल्याचे या अहवालात म्हटले गेले आहे.

वैश्विक भूकबळी निर्देशांकच्या वेबसाइटनुसार चीन, ब्राझील व कुवेत यांच्यासहित १८ देशांचा निर्देशांक ५ पेक्षा कमी आलेला आहे. लोकसंख्येच्या प्रमाणात माणशी अन्नधान्याच्या उपलब्धतेवर भूकबळी निर्देशांक मोजला जातो.

भारतात पाच वर्षांखालील मुलांचे वजन व उंची आंतरराष्ट्रीय मानकानुसार कमी असून बाल मृत्यूदराचे प्रमाणही भारतात अधिक असल्याचे या अहवालात नमूद करण्यात आले आहे.

मूळ बातमी

COMMENTS

WORDPRESS: 0
DISQUS: