चीनच्या नागरिकांना पर्यटक व्हिसा बंद

चीनच्या नागरिकांना पर्यटक व्हिसा बंद

नवी दिल्लीः चीनच्या नागरिकांना पर्यटक व्हिसा देण्याचे भारताने बंद केल्याचे वृत्त टाइम्स ऑफ इंडियाने आंतरराष्ट्रीय एअरलाइन्स संघटना आयएटीएच्या हवाल्यान

युक्रेन प्रकरणात चीन किती गुंतलंय?
आम्ही कोरोना विषाणू पसरवला नाही : चीनचे स्पष्टीकरण
चीनचा विरोध असतानाही नॅन्सी पॅलोसी यांचा तैवान दौरा यशस्वी

नवी दिल्लीः चीनच्या नागरिकांना पर्यटक व्हिसा देण्याचे भारताने बंद केल्याचे वृत्त टाइम्स ऑफ इंडियाने आंतरराष्ट्रीय एअरलाइन्स संघटना आयएटीएच्या हवाल्याने दिले आहे. चीनमध्ये शिकणाऱे २० हजाराहून अधिक भारतीय विद्यार्थी कोविडच्या कारणामुळे भारतात परत आले होते, या विद्यार्थ्यांना चीनने परत येण्याची परवानगी दिलेली नाही. त्यामुळे भारत सरकारने यापुढे चीनच्या नागरिकांना व्यापार, रोजगार, राजनयिक पातळीवर व्हिसा देणार नसल्याचे स्पष्ट केले आहे.

चीनने भारत सोडून थायलंड, पाकिस्तान, श्रीलंका या देशातील विद्यार्थ्यांना व्हिसा मंजूर केले होते पण भारतीय विद्यार्थ्यांना अजून प्रतिक्षेत ठेवले होते. हा मुद्दा भारत सरकारने चीनच्या परराष्ट्र मंत्र्यांच्या भारतदौऱ्यात उपस्थित केला होता पण त्यावर चीनने अद्याप कोणतीही पावले उचलली नसल्याने भारताने चीनच्या नागरिकांना पर्यटक व्हिसा देणे बंद केले आहे.

COMMENTS

WORDPRESS: 0
DISQUS: 0