ज्येष्ठांना मिळणारी रेल्वेभाड्यातील सवलत बंद

ज्येष्ठांना मिळणारी रेल्वेभाड्यातील सवलत बंद

नवी दिल्लीः देशातील ज्येष्ठ नागरिकांना रेल्वे प्रवासी भाड्यात दिली जाणारी सवलत बंद करण्यात आल्याची माहिती बुधवारी रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी सं

अमेरिकेतील ‘देशद्रोही’ जपानी
इम्रान खान सरकारवर अविश्वासाचा ठराव; पक्षात बंडखोरी
जो बायडेन निवडीवर पुतीन, जिनपिंग, बोल्सोनारोंचे मौन

नवी दिल्लीः देशातील ज्येष्ठ नागरिकांना रेल्वे प्रवासी भाड्यात दिली जाणारी सवलत बंद करण्यात आल्याची माहिती बुधवारी रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी संसदेत दिली. हिंदुस्तान टाइम्सने दिलेल्या वृत्तानुसार रेल्वेला मोठ्या प्रमाणात तोट्याला सामोरे जावे लागत असल्याने ज्येष्ठ नागरिकांना दिली जाणारी रेल्वे प्रवासी भाड्यात दिली जाणारी सवलत मागे घेत असल्याचे रेल्वेमंत्र्यांचे म्हणणे आहे.

कोविड-१९च्या महासाथीत मार्च २०२०मध्ये ज्येष्ठ नागरिकांना दिली जाणारी रेल्वे प्रवासी भाड्यातील सवलत बंद करण्यात आली होती. रेल्वेचा महसूल वाढण्याच्या उद्देशाने हा निर्णय घेण्यात आला होता. रेल्वेला २०१९-२०च्या तुलनेत २०२०-२१ या आर्थिक वर्षांत मोठ्या प्रमाणात प्रवासी भाड्यात तोटा सहन करावा लागला होता.

भारतीय रेल्वेकडून ज्येष्ठ नागरिकांसाठी ज्यात महिलांची वयोमर्यादा ५८ व पुरुषांची वयोमर्यादा ६० निश्चित करून त्यांच्यासाठी अनुक्रमे रेल्वे प्रवासी भाड्यात ५० टक्के व ४० टक्के सूट दिली जात होती. ज्येष्ठ नागरिकांना दिल्या जाणाऱ्या या सवलतीमुळे रेल्वेला दरवर्षी १६०० कोटी रु. नुकसान सोसावे लागत होते. तर सर्व श्रेणींसाठी सवलत दिली जात असल्याने दरवर्षी २००० कोटी रु.चा तोटा सहन करावा लागत होता. पण कोविड महासाथीत रेल्वेच्या बऱ्याच सेवा बंद कराव्या लागल्याने त्याचा परिणाम महसूलावर होऊ लागला. त्यातून रेल्वेने विद्यार्थी, आजारी रुग्ण यांना वगळून अन्य प्रवाशांना दिल्या जाणाऱ्या रेल्वेभाड्यातील सवलती बंद करण्याचा निर्णय घेतला होता.

दरम्यान रेल्वेच्या या निर्णयावर रेल्वे बोर्डाचे माजी सदस्य श्री प्रकाश यांनी नाराजी व्यक्त केली आहे. ज्येष्ठ नागरिकांना भाड्यात सवलत नाकारणे हे प्रतिगामी पाऊल असून गरीब प्रवाशांना मिळणारा त्याचा फायदाही सरकारने काढून घेतला आहे. रेल्वेच्या अशा निर्णयाने रेल्वेच्या महसूलावरच परिणाम होणार असल्याचे मत त्यांनी व्यक्त केले.

मूळ बातमी

 

 

 

COMMENTS

WORDPRESS: 0
DISQUS: 0