भारतीय श्रमिकाचे वास्तवः कमी वेतन अधिक वेळ काम

भारतीय श्रमिकाचे वास्तवः कमी वेतन अधिक वेळ काम

नवी दिल्लीः जगातल्या काही देशांच्या तुलनेत भारतीय श्रमिक/कामगाराचे कामाचे तास सर्वाधिक असून त्या बदल्यात त्याला मिळणारे वेतन सर्वात कमी असल्याची नोंद

एल्गार परिषद चौकशीत आता ईडी; गडलिंग यांच्यावर मनी लाँड्रिंगचा आरोप
मोदींच्या पीक विमा योजनेअंतर्गत प्रिमियममध्ये ३४८% ची वाढ, संरक्षित शेतक-यांची संख्या मात्र स्थिरच
आसाममधील एनआरसी डेटा गायब

नवी दिल्लीः जगातल्या काही देशांच्या तुलनेत भारतीय श्रमिक/कामगाराचे कामाचे तास सर्वाधिक असून त्या बदल्यात त्याला मिळणारे वेतन सर्वात कमी असल्याची नोंद आंतरराष्ट्रीय मजूर संघटनेच्या अहवालात नमूद करण्यात आली आहे. भारतात आठवड्याच्या कामाचे तास ४८ तासांपेक्षा अधिक असून त्यापेक्षा अधिक तास काम गाम्बिया, मंगोलिया, मालदिव व कतार देशांमध्ये करावे लागते. या चार देशांमध्ये भारतीय कामगारांची संख्या एक चतुर्थांशपेक्षा अधिक असल्याचे या अहवालात नमूद करण्यात आले आहे.

Global Wage Report 2020-21: Wages and Minimum Wages in the Time of COVID-19 नामक या अहवालात जगातल्या सर्व देशांमधील कामगारांचे कामाचे तास, त्यांना त्यांच्या कामाच्या प्रमाणात, स्तरानुसार मिळणारा मोबदला यांची माहिती व आकडेवारी आहे. ही आकडेवारी २०१९मधील परिस्थिती पाहून मांडण्यात आली आहे.

चीनमध्ये आठवड्याचे कामाचे तास ४६ निश्चित आहेत. हेच तास ब्रिटनमध्ये ३६, अमेरिकेत ३७, इस्रायलमध्ये ३६ इतके आहेत.

भारताच्या संदर्भात या अहवालात अनेक बाबी नमूद करण्यात आल्या आहेत. सहारा आफ्रिका खंडातील काही देश वगळता शेती, बांधकाम, कारखानदारी, खाण उद्योग व अन्य क्षेत्रात काम करणार्या भारतीय कामगाराला मिळणारे किमान वेतन जगातील अन्य देशांच्या तुलनेत सर्वात कमी असून भारतातील स्वयंरोजगार व नोकरदार कामगार हे भारतातील ग्रामीण भागापेक्षा अधिक तास काम करतात. भारतातील नैमित्तिक श्रमिकांचे कामाचे तास कायमस्वरुपी श्रमिकांएवढेच आहेत. ग्रामीण व शहरी भागातील भारतीय पुरुष हा स्त्रीयांपेक्षा अधिक तास काम करतो असे या अहवालात नमूद करण्यात आले आहे.

ग्रामीण भारतातला स्वयंरोजगार करणारा श्रमिक आठवड्यातले ४८ तास व महिला आठवड्यात ३७ तास काम करतात. तर ग्रामीण भागातील रोजंदारी व नोकरदार श्रमिक हा आठवड्यातले ५२ तास व महिला ४४ तास काम करतात. ग्रामीण भागातील नैमित्तिक पुरुष कामगार आठवड्यातले ४५ तास तर महिला ३९ तास काम करतात.

शहरी भागातील स्वयंरोजगार व्यक्ती आठवड्याला ५५ तास तर महिला ३९ तास काम करते. तर नोकरदार व रोजंदारीवर काम करणारा पुरुष आठवड्याला ५३ तास व महिला ४६ तास काम करते. त्याचबरोबर शहरातील नैमित्तिक पुरुष कामगार आठवड्यातले ४५ तास व महिला ३८ तास काम करते, असे या अहवालात नमूद करण्यात आले आहे. 

 

आंतरराष्ट्रीय कामगार संघटनेच्या अहवालात भारताविषयी आणखी काही निरीक्षणे नोंदवली गेली आहेत. भारतातील नोकरदार पुरुष महिलांच्या तुलनेत कामावर आपला वेळ चौपट खर्च करतात. त्याचबरोबर शहरातील नोकरदार पुरुष नोकरदार महिलेपेक्षा एक तास अधिक काम करतात. भारतातील कामगार केवळ एक चतुर्थांश वेळ मौजमस्तीवर खर्च करतो. महिला तेवढा वेळही खर्च करू शकत नाहीत, असे या अहवालात नमूद करण्यात आले आहे.

मूळ बातमी

COMMENTS

WORDPRESS: 0
DISQUS: 0