कोविड-१९ : ‘भारत बायोटेक’ला मानवी चाचणीस परवानगी

कोविड-१९ : ‘भारत बायोटेक’ला मानवी चाचणीस परवानगी

हैदराबादः शहरातील भारत बायोटेक या कंपनीच्या कोव्हॅक्सिन ( COVAXIN) या औषधाची चाचणी कोविड-१९ ग्रस्त रुग्णावर करण्यास ड्रग कंट्रोलर जनरल ऑफ इंडिया (डीजीसीआय)ने परवानगी दिली आहे. भारतात विकसित केलेले हे पहिले औषध असून त्याची मानवी चाचणी करण्यास परवानगी देण्यात आली आहे.

हे औषध विकसित करण्यात इंडियन कौन्सिल ऑफ मेडिकल रिसर्च (आयसीएमआर) व नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ व्हायरलोलॉजी (एनआयव्ही) या दोन संस्थांचेही योगदान आहे.

हे औषध कंपनीच्याच जीनोम व्हॅलीमधील भारत बायोटेक बीएसल-२ या प्रयोगशाळेत विकसित केले जात असून या औषधाने प्रारंभिक चाचण्यांमध्ये प्रतिकारक शक्ती वाढवण्याबाबत व सुरक्षिततेच्या कसोट्या पार केल्या आहेत. त्यामुळे त्यांना मानवी चाचणी करण्यास परवानगी देण्यात आल्याचे कंपनीच्या सूत्रांनी सांगितले.

या औषधाची चाचणी पुढील महिन्यात दोन टप्प्यात केली जाणार असून या कोव्हॅक्सिन विकसित करण्यात कंपनीच्या शास्त्रज्ञांनी व अन्य सहकार्यांनी भरपूर मेहनत घेतल्याचे कंपनीचे संचालक डॉ. कृष्णा इल्ला यांनी सांगितले.

कोविड-१९ वर भारतात जेडियस कॅडिला, सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया व पॅनाशिया बायोटेक या कंपन्यांकडूनही लस शोधली जात आहे. या महिन्याच्या सुरुवातीपासून पॅनाशिया बायोटेकनेही प्री-क्लिनिकल टप्पा सुरू केला आहे.

मूळ बातमी

COMMENTS