२०२०-२१च्या जीडीपीत ७.७ टक्क्याने घसरण

२०२०-२१च्या जीडीपीत ७.७ टक्क्याने घसरण

नवी दिल्लीः २०२०-२१ या आर्थिक वर्षांत देशाचा जीडीपी ७.७ टक्क्याने घसरेल असा अंदाज राष्ट्रीय सांख्यिकी संस्थेने व्यक्त केला आहे. या अगोदर रिझर्व्ह बँके

नोटाबंदी : एक फसवाफसवी – भाग २
मोदी नाही तर मग कोण?
नोटाबंदी : एक फसवाफसवी – भाग १

नवी दिल्लीः २०२०-२१ या आर्थिक वर्षांत देशाचा जीडीपी ७.७ टक्क्याने घसरेल असा अंदाज राष्ट्रीय सांख्यिकी संस्थेने व्यक्त केला आहे. या अगोदर रिझर्व्ह बँकेने जीडीपी ७.५ टक्क्याने घसरेल असा अंदाज वर्तवलाच होता. तर जागतिक बँकेने ९.६ टक्क्याने जीडीपी घसरेल असे सांगितले होते. पण सरकारने गुरुवारी अधिकृतपणे जीडीपी घसरेल असे आता सांगितले आहे. गेल्या ४० वर्षांतली सर्वांत मोठी ही घसरण आहे. २०२०-२१ या आर्थिक वर्षांत कृषी क्षेत्र वगळून अन्य सर्व क्षेत्रांमध्ये ही घसरण असल्याचे राष्ट्रीय सांख्यिकी संस्थेचे म्हणणे आहे.

२०२०-२१ या आर्थिक वर्षांत जीडीपी १२३.३९ लाख कोटी रु. राहील असा अंदाज होता. तर २०१९-२०मध्ये जीडीपी १३३.०१ लाख कोटी रु. इतका होता. ही आकडेवारी महत्त्वाची आहे कारण आता जीडीपी वाढण्याच्या अनुषंगाने सरकारला आपला आगामी अर्थसंकल्प मांडावा लागणार आहे.

कोरोना महासाथीचा जबर फटका गेल्या वर्षी अर्थव्यवस्थेला बसला होता. असंघटित क्षेत्रातील उलाढाल पूर्ण थांबली होती. कारखानदारी व अन्य व्यवसायही कोरोना महासाथीमुळे अडचणीत आले होते. आता गेल्या तीन महिन्यापासून अर्थव्यवस्थेची चक्रे फिरण्यास सुरूवात झाली आहे. काही क्षेत्रांमध्ये तसे परिणामही दिसू लागले आहेत. डिसेंबर २०२० मध्ये जीएसटी संकलन ११.६ टक्क्याने वाढून १.१५ लाख कोटी रु. इतके झाले होते.

मूळ बातमी

COMMENTS

WORDPRESS: 0
DISQUS: 0