डोनाल्ड ट्रम्प समर्थकांचा धुडगूस

डोनाल्ड ट्रम्प समर्थकांचा धुडगूस

मावळते राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या समर्थकांनी अमेरिकेच्या संसदेची सभागृहे असणाऱ्या कॅपिटॉल इमारतीमध्ये घुसण्याचा प्रयत्न केला. जाळपोळ आणि हि

१२ जुलैपर्यंत अपात्रतेची कारवाई नाही
टेक सम्राटांच्या साम्राज्यावर अंकुश
परराष्ट्रमंत्री जयशंकर-यूएस काँग्रेस बैठक रद्द

मावळते राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या समर्थकांनी अमेरिकेच्या संसदेची सभागृहे असणाऱ्या कॅपिटॉल इमारतीमध्ये घुसण्याचा प्रयत्न केला. जाळपोळ आणि हिंसक घटना झाल्याचे वृत्त असून, परिसरामध्ये संचारबंदी लागू करण्यात आली आहे. या घटनेमध्ये ४ लोकांचा मृत्यू झाला असून, ५२ जण जखमी झाले आहेत.

३०६ विरुद्ध २३२ इलेक्टोरल कॉलेजियम मतांनी अध्यक्षपदाची निवडणूक ट्रंप हरल्यानंतर ट्रंप समर्थक अस्वस्थ आहेत.

काल जो बायडेन यांच्या विजायवर शिक्कामोर्तब करण्यासाठी अमेरिकेच्या संसदेची बैठक बोलावण्यात आली होती. या बैठकीत जो बायडन यांच्या विजयाची अधिकृत घोषणा केली जाणार होती. परंतु त्याचवेळी ट्रम्प समर्थक कॅपिटॉल इमारतीमध्ये घुसले आणि गोंधळ घालायला सुरूवात केली. त्यामुळे संसदेचे कामकाज थांबवावले गेले. ट्रम्प समर्थकांची पोलिसांसोबत झटापटही झाली. ट्रंप समर्थक सभागृहाच्या दरवाज्यापर्यंत आले होते. पोलिसानी त्यांच्यावर पिस्तूल रोखल्याची छायाचित्रही प्रसिद्ध झाली आहेत. अनेक संसद सदस्य खुर्चीखाली लपले होते.

यानंतर वॉशिंग्टन डीसी परिसरामध्ये महापौरांनी संचारबंदी लागू केली आहे. भारतीय वेळेनुसार पहाटे चार वाजण्याच्या सुमारास पोलिसांनी परिस्थिती नियंत्रणात आणत पुन्हा एकदा कॅपिटॉल इमारतीभोवती सुरक्षाव्यवस्था सुरळीत केली.

‘हा विरोध नसून देशद्रोह आहे’, असे ट्विट निवडून आलेले अध्यक्ष जो बायडन यांनी केले आहे. “कॅपिटॉल बिल्डिंगबाहेर जो गोंधळ झाला, ती खरी अमेरिका नाही. कायदा न मानणाऱ्यांची ही छोटी संख्या आहे…हा देशद्रोहाचा मार्ग आहे आणि तो थांबला पाहिजे’, असं बायडेन म्हणाले.

या घटनेनंतर फेसबुक आणि ट्विटरने डोनाल्ड ट्रम्प यांच्या सोशल मिडिया अकाऊंटवर बंधने आणली. ट्विटर आणि फेसबुकने डोनाल्ड ट्रम्प यांचं अकाऊंट ब्लॉक केलं आहे. हिंसाचार सुरु असतानाच डोनाल्ड ट्रम्प यांनी अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्ष निवडीबाबात प्रसिद्ध केलेल्या एका व्हीडीओनंतर ही बंदी टाकण्यात आली आहे. ट्विटरने ट्रम्प यांचे अकाउंट १२ तासांसाठी, तर फेसबुकने २४ तासांसाठी लॉक केले आहे.

COMMENTS

WORDPRESS: 0
DISQUS: 0