टोक्यो ऑलिम्पिक एक वर्ष पुढे ढकलले

टोक्यो ऑलिम्पिक एक वर्ष पुढे ढकलले

येत्या जुलै महिन्यात जपानची राजधानी टोक्यो येथे होणारे ऑलिम्पिक कोरोना विषाणू संसर्गाचा जगभरातला हाहाकार पाहता एक वर्ष पुढे ढकलण्यात आले आहे. हे ऑलिम्

डॉ. सिंग यांना उत्तर म्हणून हर्षवर्धन काँग्रेसवर बरसले
लॉकडाऊन : ईपीएफ खातेधारक पैसे काढू शकणार
निराळ्या पीएम-केअर फंडाची गरज काय?

येत्या जुलै महिन्यात जपानची राजधानी टोक्यो येथे होणारे ऑलिम्पिक कोरोना विषाणू संसर्गाचा जगभरातला हाहाकार पाहता एक वर्ष पुढे ढकलण्यात आले आहे. हे ऑलिम्पिक पुढील वर्षी उन्हाळ्यात घेतले जाणार असून ऑलिम्पिकपटूंचे आरोग्य व या स्पर्धेतील अन्य जणांचे आरोग्य पाहून हा निर्णय घेण्यात आला असल्याचे आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक कमिटीने सोमवारी जाहीर केले. सध्या ऑलिम्पिकची ज्योत टोक्योत ठेवली जाणार आहे.

ऑलिम्पिक स्पर्धा पुढे ढकलण्यात येऊ नये, असा प्रयत्न आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक कमिटीचे अध्यक्ष थॉमस बाख यांचा होता पण जपानचे पंतप्रधान शिंझो अबे यांनी बाख यांच्याशी चर्चा करून ऑलिम्पिक रद्द न करता ते पुढे ढकलण्याचा निर्णय घेतला.

COMMENTS

WORDPRESS: 0
DISQUS: 0