कोरोना आजारातून बरे होणार म्हणजे काय?

कोरोना आजारातून बरे होणार म्हणजे काय?

कोरोना विषाणू संसर्गामुळे वाढता मृत्यूचा आकडा पाहता ही साथ भयावह असल्याचे एक चित्र जगभर पसरले आहे. त्यामध्ये अंशत: तथ्य आहे पण आजपर्यंत कोरोनाची लागण

राज्यात येत्या सोमवारपासून शाळा सुरू
‘करोनाच्या धोका; उद्योग जगताने मदत करावी’
‘लसीकरणावर ३५ हजार कोटी रु. कसे खर्च केले?’

कोरोना विषाणू संसर्गामुळे वाढता मृत्यूचा आकडा पाहता ही साथ भयावह असल्याचे एक चित्र जगभर पसरले आहे. त्यामध्ये अंशत: तथ्य आहे पण आजपर्यंत कोरोनाची लागण होऊन मृत्यूचा आकडा हा या साथीतून बर्या होणार्या आकड्याच्या तुलनेत खूपच कमी आहे. एकंदरीत कोरोनाची लागण झालेल्यांची संख्याही वाढत असली तरी बरे होणार्या रुग्णांचीही संख्या वाढत आहे.

गेल्या मार्चमध्ये अमेरिकेमध्ये कोरोनातून वाचणार्यांची संख्या शून्य होती पण आता हा आकडा हजारो झाला आहे व तो दररोज वाढत आहे. या पार्श्वभूमीवर कोरोना संसर्गातून बरे होणे म्हणजे नेमके काय असते हे पाहूया.

कोविड-१९ च्या विरोधात आपले शरीर कसे लढते?

जेव्हा एखादी व्यक्ती कोरोना विषाणूबाधित होते तेव्हा लगेचच त्या व्यक्तीच्या शरीरात प्रोटीनचा (अँटीबॉडीज) स्राव वाढत जाऊन ते कोरोना विषाणूशी दोन हात करण्यास सुरवात करतात. यातून प्रोटीनविरोधात थेट लढाई सुरू झाल्यानंतर कोरोना विषाणूंचा शरीरातील पसरण्यावर मर्यादा येते व एका टप्प्यानंतर विषाणू निष्प्रभ होतो. ज्या व्यक्तीची प्रतिकारक शक्ती चांगली असते ती विषाणूचा पूर्णपणे नि:पात करते. नंतर या साथीतून बरा झालेल्या व्यक्तीच्या शरीरावर त्याचे कोणतेही वाईट परिणाम होत नाहीत. तो तंदुरुस्त होतो.

सार्स कोव्ह-२ या विषाणूचा संसर्ग झाल्यानंतर साधारण ७ दिवसानंतर बाधित व्यक्तीला लक्षणे जाणवू लागतात. समजा लक्षणे जरी दिसत नसल्यास विषाणू शरीरात कार्यरत राहतो, अशा व्यक्तीला विलगीकरणात ठेवण्यात येते.

प्रतिकारक शक्ती म्हणजे काय?

एखाद्या विषाणूजन्य आजारातून रुग्ण बरा झाल्यानंतर त्याच्या शरीरातील लिम्फोसाइट्स पेशी जागृत असतात. या पेशी विषाणूला ओळखत असतात, त्याच्याशी त्यांनी पूर्वी संघर्ष करून त्यांना परतावून लावलेले असते. त्यामुळे पुढे हे विषाणू पुन्हा शरीरात आल्यास ते निष्प्रभ होतात. मानवी शरीरात अँटिबॉडिज असतात त्या शरीरात प्रवेश करणार्या कोणत्याही विषाणूचा प्रतिकार करत असतात. यालाच प्रतिकार क्षमता म्हणतात. ही प्रतिकारक क्षमता वाढवणे हेच अनेक औषधांचे काम असते.

पण प्रतिकार शक्ती ही काही पूर्ण सक्षम नसते. गालगुंडसारखे विषाणूजन्य आजार परतावून लावल्यानंतरही शरीरात काही विषाणू राहिलेले असतात त्यांना मारण्यासाठी शरीरात पर्याप्त प्रतिकारक शक्ती नसते अशा वेळी पुन्हा लसीकरण करून घ्यावे लागते. या लसीमुळे शरीराची पुन्हा प्रतिकारक क्षमता (अँटिबॉडी) वाढते व मेमरी पेशींची संख्या वाढते.

पण कोरोना विषाणू हा नव्याने आढळला असल्याने यातून बर्या झालेल्या रुग्णांची प्रतिकारक शक्ती भविष्यात कामी येईल याबाबत शास्त्रज्ञांमध्ये अजून शंकाकुशंका आहे. त्यामुळे सध्या डॉक्टर कोरोनाग्रस्त रुग्णांमधील व बर्या झालेल्या रुग्णांमधील अँटिबॉडिजवर लक्ष ठेवतात व त्यावरून प्रतिकारक क्षमतेचा अंदाज येऊ लागला आहे. पण प्रश्न असाही की अशी प्रतिकारक शक्ती किती काळ राहते?

कोरोना विषाणूं वर्गामधील सार्स किंवा मर्स रुग्णांमध्ये जी प्रतिकारक क्षमता निर्माण होते ती अल्पकाळ असते. पण सार्स कोव्ह-२मध्ये ती असेल याबाबत मला शंका वाटते. पण यावर अजून संशोधन सुरू आहे. त्यामुळे निश्चित असे उत्तर देता येणार नाही.

अमेरिकेत कोरोनाबाधित रुग्ण कसे बरे झाले?

कोरोना विषाणू हा भयंकर असल्याचे लक्षात आल्यानंतर सेंटर्स फॉर डिसिज कंट्रोल अँड प्रिव्हेंशन या संस्थेने कोरोना रुग्ण बरा झाला म्हणजे नेमके काय झाले यावर काळजीपूर्वक पावले उचलली. कोरोना रुग्णावर सर्व वैद्यकीय उपचार व चाचण्या झाल्यानंतर तो रुग्ण बरा झाला असे सांगण्यात आले.

वैद्यकीय दृष्ट्या कोरोनातून बरा झालेला रुग्ण हा पुढे तीन दिवस संपूर्णपणे तापमुक्त असला पाहिजे. त्यात त्याच्यावर कोणतेही औषधोपचार करण्याची गरज भासली नाही पाहिजे. त्या दिवसांत रुग्णाला योग्यरित्या श्वसन करता आले पाहिजे, त्याचा खोकला कमी झालेला असला पाहिजे. ही परिस्थिती पुढे सात दिवस कायम राहिली पाहिजे. त्याचबरोबर त्या रुग्णाच्या दोन कोरोना चाचण्या निगेटिव्ह आल्या पाहिजेत. या चाचण्यांमध्ये किमान २४ तासांचा अवधी असावा. जर लक्षणे व चाचण्यांच्या अटी या मिळत्याजुळत्या झाल्या तरच तो रुग्ण पूर्णपणे तंदुरुस्त झाला असे सीडीसीनुसार मानले जाते.

मार्च महिन्यात अमेरिकेत चाचण्यांची कमतरता असल्याने तेथे कोरोनाची साथ पसरत गेली पण नंतर चाचण्यांची संख्या वाढत गेली तसे ही साथ कमी होत गेली. आता नवे रुग्ण सापडल्याने संशोधकांना प्रतिकारक क्षमता किती काळ व्यक्तीमध्ये राहते याचा अभ्यास करता येऊ लागला आहे.

रुग्ण बरा झाल्यावर काय करता येईल ?

कोरोनामुक्त झालेल्या व्यक्तीस पुन्हा कोरोना होऊ शकत नाही, हे लक्षात आल्यानंतर अशा व्यक्ती, गट व समाज हा कोरोनाबाधितांच्या मदतीकरिता येऊ शकतो. त्यामुळे सध्याच्या आरोग्य व्यवस्थेवर पडणारा ताण कमी होऊ शकतो.

मात्र जेव्हा ही साथ एखाद्या भागात उच्चांक गाठेल त्यावेळी नव्या रुग्णांची संख्या वाढत होत जाईल त्याचबरोबर या आजारातून बर्या झालेल्या रुग्णांच्या संख्येतही वाढ होईल. हे प्रमाण वाढत गेल्यास संसर्गाचा फैलाव कमी होत जाईल.

जेव्हा संसर्गाचा फैलाव कमी होईल तसे सामाजिक विलगीकरणाची मर्यादा कमी होत जाईल. दैनंदिन व्यवहार सुरू होतील.

सध्याच्या घडीला सामाजिक विलगीकरणाचा पर्याय कोरोनाचा संसर्ग रोखण्यास कामी येत आहे आणि जगाने एकदा कोरोना संसर्गाचा अत्युच्च आकडा गाठल्यास त्यानंतर परिस्थिती सुधारेल. एकंदरीत सामाजिक विलगीकरणामुळे विषाणूचे संक्रमण कमी होत आहे, आणि हेच सध्या आवश्यक आहे.

टॉम ड्यूझायन्स्कीDirector Epidemiology Education, IUPUI

मूळ लेखाची लिंक

COMMENTS

WORDPRESS: 0
DISQUS: 0