प्रसिद्ध इराणी दिग्दर्शक जफर पनाहींना ६ वर्षांचा तुरुंगवास

प्रसिद्ध इराणी दिग्दर्शक जफर पनाहींना ६ वर्षांचा तुरुंगवास

दुबईः जगप्रसिद्ध इराणी चित्रपट निर्माते व दिग्दर्शक जफर पनाही यांना तेहरान येथील एका न्यायालयाने ६ वर्षांचा तुरुंगवास सुनावला आहे. २०१० पासून पनाही हे

‘पद्मनाभस्वामी मंदिरावर त्रावणकोर घराण्याचाच अधिकार’
भाजपच्या दबावामुळे फेसबुकने १४ पेज हटवले
नागपूर पोलिसांकडून सर्वांत जुना रेड लाइट एरिया अचानक बंद

दुबईः जगप्रसिद्ध इराणी चित्रपट निर्माते व दिग्दर्शक जफर पनाही यांना तेहरान येथील एका न्यायालयाने ६ वर्षांचा तुरुंगवास सुनावला आहे. २०१० पासून पनाही हे इराणच्या इस्लामिक राजवटीविरोधात प्रचार करत असून त्या बद्दल त्यांना तुरुंगवास ठोठावत असल्याचे न्यायालयाचे म्हणणे आहे.

गेल्या ११ जुलैला पनाही यांना पोलिसांनी ताब्यात घेतले होते. पनाही यांच्या बरोबर अन्य दोन चित्रपटनिर्माते मोहम्मद रसुलोफ व मुस्तफा अलेहमाद यांनाही सुरक्षाविषयक एका खटल्याप्रकरणी ताब्यात घेण्यात आले होते.

पनाही यांच्याविरोधात २०१० पासून एक खटला सुरू असून पनाही हे इराणच्या इस्लामिक राजवटीविरोधात आपली मते मांडत असल्याचे पोलिसांचे म्हणणे आहे. पनाही यांना २०१०मध्ये सहा वर्षांचा तुरुंगवास ठोठावण्यात आला होता तसेच त्यांना परदेशात जाण्यास २० वर्षे मनाई करण्यात आली होती. पनाही यांच्या सर्व चित्रपटांना इराणमध्ये बंदी घालण्यात आली होती. या वेळी पनाही यांनी आपण अन्यायाचे बळी ठरले असून माझ्यावर लावलेले सर्व आरोप एक विनोद असल्याची टिप्पण्णी केली होती. पनाही यांना त्यानंतर जामीनावर सोडण्यात आले होते. हाच खटला आता पुन्हा नव्याने उभा करत त्यांना तुरुंगवास ठोठावला गेला आहे.

पनाही यांची चित्रपट कारकीर्द

इराणच्याच नव्हे तर जागतिक चित्रपट वैभवात भर टाकणाऱ्या मोजक्या चित्रपट निर्माते-दिग्दर्शनात जफर पनाही यांचे नाव घेतले जाते. त्यांच्या १९९५ साली प्रसिद्ध झालेल्या ‘व्हाइट बलून’ या चित्रपटाला प्रतिष्ठेचा कान पुरस्कार मिळाला होता. त्यानंतर २०१५ मध्ये त्यांच्या ‘टॅक्सी’ या चित्रपटाला बर्लिन चित्रपट महोत्सवात गोल्डन बेअर पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते. पनाही यांनी जामिनावर असताना ‘टॅक्सी’ दिग्दर्शित केला होता.

दरम्यान पनाही यांना अटक केल्याच्या प्रतिक्रिया जगभरातील चित्रपटसृष्टी वर्तुळात उमटत असून कान महोत्सवाच्या आयोजकांनी पनाही यांच्या अटकेवर नाराजी व्यक्त केली आहे. पनाही यांना तेहरान सरकारने त्वरित सोडवावे अशी मागणी आयोजकांनी केली आहे.

मूळ बातमी

COMMENTS

WORDPRESS: 0
DISQUS: 0