मोदी-शीख मैत्रीचा प्रचार; २ कोटी इमेल पाठवले

मोदी-शीख मैत्रीचा प्रचार; २ कोटी इमेल पाठवले

नवी दिल्लीः केंद्र सरकारच्या तीन शेती कायद्याविरोधात संपूर्ण पंजाबमधील शेतकरी रस्त्यावर आंदोलने करत असताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पंजाबमधील शीख

सत्तेचा ‘हूक अँड क्रूक’ पॅटर्न!
अमित शाह यांच्या मंत्रिमंडळ प्रवेशाचा अन्वयार्थ
मोदींच्या राज्यात भारतीय मुस्लिम!

नवी दिल्लीः केंद्र सरकारच्या तीन शेती कायद्याविरोधात संपूर्ण पंजाबमधील शेतकरी रस्त्यावर आंदोलने करत असताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पंजाबमधील शीख समुदायासाठी घेतलेल्या १३ निर्णयांची जाहिरात करण्यासाठी आयआरसीटीसीने ८ ते १२ डिसेंबर दरम्यान सुमारे २ कोटी इमेल पाठवले आहेत. हे सर्व इमेल आयआरसीटीसीकडे असणार्या सर्व डेटाबेसना पाठवण्यात आले आहेत. आयआरसीटीसीच्या माध्यमातून जे ग्राहक रेल्वे तिकीटचे बुकिंग करतात त्यांना हे इमेल गेलेले आहेत.

या इमेलमध्ये रेल्वे सार्वजनिक उपक्रम (पीएसयू) व इंडियन रेल्वे केटरिंग अँड टुरिझम कॉर्पोरेशन (आयआरसीटीसी)ने आपल्या ग्राहकांना ४७ पानांची एक पुस्तिका पाठवली आहे. या पुस्तकाचे शीर्षकच हिंदीमध्ये ‘प्रधानमंत्री मोदी और उनकी सरकार का सिख समुदाय के साथ अटूट सम्बन्ध’ असे आहे. हे पुस्तक हिंदीशिवाय इंग्रजी व पंजाबी भाषेतही आहेत.

हे इमेल जनहितासाठी पाठवण्यात आले असून या इमेलच्या माध्यमातून शेतकर्यांचे नव्या शेती कायद्यासंदर्भात प्रबोधन करणे, त्यांच्या मनातील संशय दूर करणे हा आहे असे आयआरसीटीसीचे म्हणणे आहे. पण हे इमेल केवळ शीख समुदायांना पाठवण्यात आले आहेत, हा आरोप पीयूसीने फेटाळला आहे.

पुस्तिकेत काय आहे?

या पुस्तिकेत १९८४च्या दंगल पीडितांना न्याय, श्री हरमंदर साहिब, जालियनवाला बाग स्मारकाला एफसीआरए नोंदणीची परवानगी, लंगरवरील कर रद्द, कर्तारपूर कॉरिडोर या सारख्या बाबींचा उल्लेख आहे. या पुस्तिकेचे प्रकाशन १ डिसेंबरला गुरुनानक जयंतीच्या निमित्त्याने केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर व हरदीप सिंह पुरी यांच्या हस्ते झाले होते.

मूळ बातमी

COMMENTS

WORDPRESS: 0
DISQUS: 0