ट्रम्प यांचा दौरा आटोपला, सीएएवर भाष्य नाही

ट्रम्प यांचा दौरा आटोपला, सीएएवर भाष्य नाही

नवी दिल्ली : अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचा दोन दिवसांचा भारत दौरा मंगळवारी रात्री संपुष्टात आला. मंगळवारी संध्याकाळी पत्रकारांशी संवाद साधतान

बायडन यांच्याकडे सूत्रे देण्यास ट्रम्प तयार
इराण –अमेरिका तणावामुळे आखाती युद्ध घडेल का?
लैंगिक छळवणुकीविरुद्धचा स्त्रीवादी लढा

नवी दिल्ली : अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचा दोन दिवसांचा भारत दौरा मंगळवारी रात्री संपुष्टात आला. मंगळवारी संध्याकाळी पत्रकारांशी संवाद साधताना त्यांनी वादग्रस्त नागरिकत्व दुरुस्ती कायद्यावर कोणतेही विस्तृत भाष्य न करता भारत सरकार त्यावर योग्य निर्णय घेईल व योग्य पावले उचलेल, अशी प्रतिक्रिया दिली.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी चर्चा करताना सीएएचा मुद्दा आला होता. त्यावेळी धार्मिक स्वातंत्र्याच्या बाजूने मोदी आहेत, असे ट्रम्प म्हणाले. दिल्लीतल्या हिंसाचाराबद्दल मी ऐकले होते पण त्यावर मी मोदींशी बोललो नाही, असेही ट्रम्प यांनी स्पष्ट केले.

काश्मीरविषयी बोलताना ट्रम्प यांनी या मुद्द्यावर दोन बाजू आहेत, प्रत्येकाची दुसऱ्याच्या विरोधात बाजू आहे. त्यामुळे हा विषय चर्चेद्वारे सुटू शकतो असे वाटते. अमेरिका काश्मीरप्रश्नात मध्यस्थीची बाजू घेण्यात उत्सुक आहे पण त्यासंदर्भात मी मोदींशी बोललेलो नाही, असेही ट्रम्प यांनी स्पष्ट केले.

ट्रम्प यांनी पाकिस्तानपुरस्कृत दहशतवादवरून मोदींशी प्रदीर्घ चर्चा झाल्याचेही पत्रकारांना सांगितले. या संदर्भात अमेरिका जी मदत शक्य असेल ती देण्यास तयार आहे, माझे पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांच्याशी चांगले संबंध आहेत व मोदींशीही आहेत. यावर मध्यस्थ म्हणून वा मदत म्हणून मी तयार आहे, असे ट्रम्प म्हणाले.

मोदींची तारीफ

ट्रम्प यांनी पत्रकार परिषदेत मोदींची पुन्हा तारीफ केली. भारत देश हा प्रचंड देश असून मोदी हे उत्कृष्ट नेते आहेत. आम्ही दोघांनी अनेक विषयांवर चर्चा केल्या आहेत. आम्हा दोघांमध्ये विशेष बंध तयार झाले आहेत, असे ट्रम्प म्हणाले.

भारतासोबत तीन करार

अमेरिकेने भारतासोबत संरक्षण व सुरक्षा, व्यापार व ऊर्जा क्षेत्रासंदर्भात तीन करार केले असल्याची माहिती ट्रम्प यांनी दिली. संरक्षणाचा सुमारे तीन अब्ज डॉलरचा करार ट्रम्प यांनी घोषित केला तर व्यापाराबाबत चर्चा सुरू असून त्यावर अंतिम निर्णय घेतला जाणार आहे, फाइव्ह जी तंत्रज्ञान व इंडो पॅसिफिक परिस्थितीवरही चर्चा झाल्याचे ट्रम्प यांनी सांगितले.

COMMENTS

WORDPRESS: 0
DISQUS: 0