इस्रोच्या इतिहासात ‘चांद्रयान-२’ व्यतिरिक्त आणखी एका यशाची नोंद

इस्रोच्या इतिहासात ‘चांद्रयान-२’ व्यतिरिक्त आणखी एका यशाची नोंद

इस्रोच्या इतिहासात २२ जुलै हा दिवस आणखी वेगळ्या अर्थाने नोंद केला जाईल. गेली दोन दशके भारत जीएसएलव्ही एमके III रॉकेटच्या उभारणीचे प्रयत्न करत होता. या प्रयत्नांना पहिल्याच प्रक्षेपणात यश आले आहे.

दिल्ली दंगलीत गोळ्या झाडणाऱ्या शाहरूखला अटक
‘हिवरेबाजार पॅटर्न’चे पंतप्रधानांकडून कौतुक
“छत और आसमां” – एका असामान्य प्रेमाची कथा…

२२ जुलै २०१९ रोजी दुपारी २ वाजून ४३ मिनिटांनी इंडियन स्पेस रिसर्च ऑर्गनायझेशन (इस्रो)च्या जीएसएलव्ही एमके III रॉकेटने ‘चांद्रयान-२’ला घेऊन अवकाशात यशस्वी प्रक्षेपण केले. चंद्रावर यान उतरवून त्यातून बग्गी चंद्राच्या पृष्ठभागावर उतरवणे हा प्रयत्न भारताच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचा अाहे. ७ सप्टेंबरला हे यान व बग्गी चंद्रावर उतरवण्यात भारत यशस्वी ठरल्यास अशी किमया साधणाऱ्या तीन देशांच्या पंक्तीत चौथा देश म्हणून भारताची नोंद होईल. त्यानंतर ऑर्बिटर, लँडर व रोव्हर चंद्राच्या पृष्ठभागाचा अभ्यास करतील. या अभ्यासातून भविष्यात चंद्रावर अन्य मोहिमा आखता येतील.

इस्रोच्या इतिहासात २२ जुलै हा दिवस आणखी वेगळ्या अर्थाने नोंद केला जाईल. गेली दोन दशके भारत जीएसएलव्ही एमके III रॉकेटच्या उभारणीचे प्रयत्न करत होता. या प्रयत्नांना पहिल्याच प्रक्षेपणात यश आले आहे.

एमके III रॉकेट इतर जीएसएलव्हीच्या तुलनेत वेगळे असते. आपल्याला पीएसएलव्ही रॉकेट माहिती आहे. या रॉकेटची अवकाशात १५०० किलो ग्रॅम वजन वाहून नेण्याची क्षमता असते. अशा रॉकेटच्या माध्यमातून दळणवळण उपग्रह अवकाशात सोडले जातात. पण सध्या आधुनिक दळणवळण उपग्रह वजनाने अधिक असतात. त्यामुळे इस्रोने जीएसएलव्ही रॉकेटची बांधणी हाती घेतली. या रॉकेटमधून अवजड असे उपग्रहाचे तीन टप्पे अवकाशात सोडले जातात. प्रत्येक टप्प्यात इंधनाच्या मदतीने पुढील टप्प्याला अधिक गती दिली जाते. पीएसएलव्हीमध्ये घन व द्रवरुपात इंधन वापरले जात असे. पण जीएसएलव्हीमध्ये क्रायोजेनिक इंजिन वापरले जात असून त्यात हायड्रोजन व ऑक्सिजन हे वायू इंधन व ऑक्सिडायझर म्हणून वापरले जातात. अन्य इंधनाच्या तुलनेत हायड्रोजनमुळे रॉकेटला मोठ्या प्रमाणात गती दिली जाते.

जीएसएलव्ही एमके I रॉकेटमध्ये क्रायोजेनिक इंजिन असते. इस्रोने ते रशियाकडून विकत घेतले होते. एप्रिल २००१मध्ये या रॉकेटच्या मदतीने इस्रोने जीसॅट- I अवकाशात यशस्वी सोडला होता. २००३मध्येही या रॉकेटच्या मदतीने उपग्रह अवकाशात सोडला होता. पण २००६, २००७ व २०१०मध्ये या रॉकेटला अपयश आले होते.

जीएसएलव्ही एमके II हे एमके I सारखे दिसते पण त्यामध्ये इस्रोने विकसित केलेले सीई ७.५ क्रायोजेनिक इंजिन बसवण्यात आले आहे. २०१०मध्ये याचे एक उड्‌डाण अयशस्वी झाले होते. पण २०१४, २०१५मध्ये या रॉकेटच्या प्रक्षेपणाला यश आले होते. नंतर २०१६, २०१७ आणि २०१८मधील दोन प्रक्षेपण यशस्वी ठरली होती. या वर्षी सप्टेंबर व नोव्हेंबर महिन्यात एमके- IIच्या माध्यमातून जीसॅट – I व जीसॅट- I अशा दोन मोहीमा हाती घेतल्या जाणाऱ्या आहेत.

जीएसएलव्ही एमके-III हे एमके-I किंवा एमके-II पेक्षा भिन्न आहे. याचे डिझाईन एरियन -५ सारखे आहे. त्याचबरोबर या रॉकेटमध्ये इस्रोने विकसित केलेले सीई२० हे क्रायोजेनिक इंजिन आहे.

डिसेंबर २०१४मध्ये क्रायोजेनिक अप्पर स्टेजविना एमके-III अवकाशात पाठवले होते. नंतर सीई-२०च्या चाचण्या जून २०१७ व नोव्हेंबर २०१८मध्ये घेण्यात आल्या होत्या. दोन्ही चाचण्या यशस्वी ठरल्या होत्या. आता २२ जुलै २०१९ रोजी एमके-III आपल्या पहिल्या उड्‌डाणात यशस्वी ठरले आहे.

या रॉकेटच्या यशस्वी उड्‌डाणामुळे इस्रो आता नवे इंजिनही बनवू शकते. ही इंिजने नेहमीच्या क्रायोजेनिक वा सेमी क्रायोजेनिक इंजिनासारखी नसतील. तसेच अशा इंजिनाच्या उत्पादनालाही कमी खर्च येईल. २०३० पर्यंत इस्रोपुढे पुनर्वापर रॉकेट विकसित करण्याचे उद्दिष्ट्य आहे. या रॉकेटमध्ये इंधन म्हणून ऑक्सिडायझर ऑक्सिजन व हायग्रेड केरेसीन वापरण्यात येणार आहे.

एमके-IIIच्या माध्यमातून साडेपाच टन वजनाचा उपग्रह अवकाशात नेणे हाच एक मोठा पल्ला होता. तो साध्य केला आहे.

मूळ लेख

COMMENTS

WORDPRESS: 0
DISQUS: 0