‘चांद्रयान-२’चे यशस्वी प्रक्षेपण, देशभर जल्लोष

‘चांद्रयान-२’चे यशस्वी प्रक्षेपण, देशभर जल्लोष

श्रीहरिकोटा : चंद्राच्या अज्ञात पृष्ठभागाचे रहस्य जाणून घेणारे ‘चांद्रयान-२’ अखेर सोमवारी दुपारी २ वाजून४३ मिनिटांनी आंध्र प्रदेशातून श्रीहरिकोटास्थित

उ. प्रदेशात सर्वाधिक मानवाधिकार उल्लंघनाच्या तक्रारी
पक्षात परिवर्तन हवे; २३ नेत्यांचे सोनियांना पत्र
गुरांच्या छावणीत साताऱ्यातील गावांचे स्थलांतर

श्रीहरिकोटा : चंद्राच्या अज्ञात पृष्ठभागाचे रहस्य जाणून घेणारे ‘चांद्रयान-२’ अखेर सोमवारी दुपारी २ वाजून४३ मिनिटांनी आंध्र प्रदेशातून श्रीहरिकोटास्थित सतीश धवन अंतराळ केंद्रातून अवकाशात यशस्वीपणे झेपावले. ‘बाहुबली’ असे नाव दिलेल्या ‘जीएसएलव्ही एमके III या रॉकेटच्या मदतीने हे ‘चांद्रयान-२’ अवकाशात निघाले आणि १६ मिनिटानंतर त्याने पृथ्वीच्या कक्षेत प्रवेश केला.

इस्रोच्या या कामगिरीवर संपूर्ण देशाने शुभेच्छांचा वर्षाव केला असून या संस्थेच्या अथक परिश्रमाबद्दल, निष्ठांबाबत राष्ट्रपती व पंतप्रधानांनी गौरवोद्गार काढले आहेत. तर इस्रोचे प्रमुख के. सिवन यांनी आमच्या अपेक्षेपेक्षा चांद्रयानाचे अधिक चांगले प्रक्षेपण झाल्याची प्रतिक्रिया दिली. भारताचा चंद्राकडे एक ऐतिहासिक प्रवास सुरू झाला असून हे सर्व यश आपल्या सहकाऱ्यांच्या अविरत मेहनतीचे, कष्टाचे आहे असे ते म्हणाले.

आता ‘चांद्रयान-२’ पृथ्वीचे कक्षेत गेल्याने या अंतराळ मोहिमेतील पहिला टप्पा पार पडला अाहे. ‘चांद्रयान-२’मध्ये ऑर्बिटर, लँडर व रोव्हर असे तीन भाग असून त्यांचे एकूण वजन ३,८५० किलो ग्रॅम आहे.

हे ‘चांद्रयान-२’ चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर उतरण्याआधी १५ विविध टप्प्यातून जाईल व सप्टेंबर महिन्याच्या पहिल्या आठवड्यात ते चंद्रावर उतरण्याची शक्यता आहे.

आजपर्यंत ज्या देशांनी चांद्रमोहिमा हाती घेतल्या त्यांनी चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर जाऊन संशोधन केले नव्हते पण इस्रोचे ‘चांद्रयान-२’ हे चंद्राच्या द. ध्रुवाच्या पृष्ठभागावर जाऊन तेथील जमिनीच्या चाचण्या व भूगर्भीय हालचालींची नोंद करणार आहे. हे प्रयोग अत्यंत जटील असतील असे इस्रोचे म्हणणे आहे.

तीन टप्प्यांची मोहीम

‘चांद्रयान-२’ मोहिमेचे ऑर्बिटर, लँडर (विक्रम) आणि रोव्हर (प्रग्यान) असे तीन मॉड्यूल्स असतील. यापैकी ऑर्बिटर व लँडर मॉड्युल जीएसएलव्ही एमके-III या अग्निबाणाद्वारे सोडले जातील. यातील बग्गी (रोव्हर-प्रग्यान) ही ‘विक्रम’मध्ये असेल. जीएसएलव्ही एमके-III अवकाशात चंद्राच्या कक्षेत गेल्यानंतर ‘विक्रम’ हे ऑर्बिटरपासून विलग होईल आणि ते अत्यंत सावकाश चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर निश्चित केलेल्या प्रदेशात उतरेल. त्यानंतर ‘विक्रम’मधून ‘प्रग्यान’बग्गी बाहेर पडेल व ती चंद्राच्या पृष्ठभागाच्या चाचण्या घेण्यास सुरवात करेल. ही बग्गी ८ किंवा ९ सप्टेंबर रोजी चंद्रावर उतरण्याची शक्यता आहे. ‘प्रग्यान’ बग्गी १४ (पृथ्वीचे) दिवस चंद्राचा अभ्यास करेल. नंतर पुढे वर्षभर ‘विक्रम’कडून चंद्राची माहिती मिळवली जाईल. असा प्रयत्न आजपर्यंत एकाही देशाने केलेला नसल्याची माहिती इस्रोने दिली.

२००८मध्ये यूपीए-१ सरकारच्या काळात ‘चांद्रयान-१’ मोहीम हाती घेण्यात आली होती. त्यावेळी या मोहिमेद्वारे भारताचे पाच, युरोपचे तीन, अमेरिकेचे दोन व बल्गेरियाचा एक उपग्रह अवकाशात यशस्वी सोडण्यात आले होते. पण या मोहिमेत चंद्राच्या पृष्ठभागावर बग्गी उतरवण्याचे उद्दिष्ट नव्हते. त्यावेळी १.४ टन वजनाचा उपग्रह चंद्राच्या कक्षेत १०० किमी अंतरावर सोडण्यात आला होता. एक वर्षाने मात्र ही मोहीम काही तांत्रिक कारणाने सोडून देण्यात आली होती. ‘चांद्रयान-२’ मोहिमेतील बग्गी चंद्राच्या पृष्ठभागावर उतरवण्यापर्यंतची कामगिरी डॉ. वनिता व डॉ. रितू या दोन शास्त्रज्ञांकडे सोपवण्यात आली आहे आणि असा इस्रोच्या इतिहासातला पहिला प्रयत्न आहे.

मोहिमेचा खर्च ९७८ कोटी रु.

‘चांद्रयान-१’, ‘मंगलयान-१’ नंतर इस्रोची ‘चांद्रयान-२’ ही तिसरी महत्त्वाकांक्षी मोहीम असून तिचा खर्च ९७८ कोटी रुपये आहे. सुमारे ५४ दिवसांचा ३ लाख ८४ हजार किमी. प्रवास करून ‘चांद्रयान-२’ चंद्राच्या कक्षेत पोहचेल. 

COMMENTS

WORDPRESS: 0
DISQUS: 0