दै. भास्करच्या कार्यालयांवर प्राप्तीकर खात्याचे छापे

दै. भास्करच्या कार्यालयांवर प्राप्तीकर खात्याचे छापे

नवी दिल्ली/जयपूरः करबुडवेगिरीप्रकरणी देशातील अग्रगण्य समजल्या जाणार्या दैनिक भास्करच्या विविध शहरांतील कार्यालयांवर गुरुवारी सकाळी प्राप्तीकर खात्याने

कोळसा घोटाळाः बीजेडी नेत्याला ३ वर्षांचा तुरुंगवास
वानखेडे यांच्याकडून ड्रग्ज प्रकरणाचा तपास काढून घेतला
अस्थानांच्या नियुक्तीला दिल्ली विधानसभेचा विरोध

नवी दिल्ली/जयपूरः करबुडवेगिरीप्रकरणी देशातील अग्रगण्य समजल्या जाणार्या दैनिक भास्करच्या विविध शहरांतील कार्यालयांवर गुरुवारी सकाळी प्राप्तीकर खात्याने छापे टाकले. दै. भास्कर बरोबर उ. प्रदेशातील एक वृत्तवाहिनी ‘भारत समाचार’च्याही कार्यालयावर प्राप्तीकर खात्याने छापे मारले.

दै. भास्करवरील हे छापे भोपाळ, जयपूर, अहमदाबाद, मुंबई व अन्य शहरातील कार्यालयांवर मारण्यात आले. या छाप्यांसंदर्भात प्राप्तीकर खात्याने सविस्तर माहिती प्रसिद्ध केलेली नाही. हे छापे करचुकवेगिरी प्रकरणात असल्याचे समजते.

एएनआयने दिलेल्या वृत्तानुसार प्राप्तीकर खात्याने आपले छापे दै. भास्करच्या मालकांच्या निवासस्थानी व त्यांच्या कार्यालयावरही मारले आहेत.

दै. भास्करच्या छाप्यानंतर संसदेच्या दोन्ही सभागृहांत या प्रकरणी गोंधळ उडाला. विरोधकांनी सरकार प्रसार माध्यमांची मुस्कटदाबी करत असल्याचा आरोप केला. दै. भास्करने कोविड-१९च्या मृत्यूंबाबत शोधपत्रकारिता करून सरकारचे पितळ उघडे केले होते, सरकारला त्याचा बदला घ्यायचा होता म्हणून ही कारवाई करण्यात आली असा आरोप विरोधी पक्षांनी केला.

काँग्रेसचे राज्यसभेतील खासदार दिग्विजय सिंह यांनी ट्विट करून मोदी-शहाचा पत्रकारितेवर प्रहार, मोदी-शहाचे एक मात्र हत्यार आयटी, ईडी, सीबीआय, अशी टिप्पण्णी केली. या कारवाईनंतर या वृत्तसमुहाचे मालक अग्रवाल बंधु घाबरणार नाहीत याचा मला विश्वास वाटतो, असे दिग्विजय सिंह म्हणाले.

दिल्लीचे मुख्यमंत्री व आम आदमी पार्टीचे अध्यक्ष अरविंद केजरीवाल यांनी दै. भास्कर व भारतीय समाचारच्या कार्यालयांवर टाकलेल्या प्राप्तीकर खात्याच्या छाप्यांवर प्रतिक्रिया देताना सरकार माध्यम समुहांना भयभीत करत असल्याचा आरोप केला. आपल्या विरोधात कोणी बोलेल त्याच्यावर कारवाई करणे हाच भाजपचा प्रयत्न असून त्यांची ही मानसिकता खतरनाक आहे. अशा दडपशाहीविरोधात सर्वांनी आवाज उठवला पाहिजे, असे ते म्हणाले.

दै. भास्कर समूहाच्या देशातील विविध दैनिकांनी कोविड मृत्यूंमागील मोदी सरकारचा व भाजपशासित राज्यातील सरकारांचा बेजबाबदारपणा उघडकीस आणला होता. गुजरातमध्ये भाजपाचे अध्यक्ष सीआर पाटील यांनी आपल्याकडे रेमडेसिविर असल्याचा दावा केला होता. त्यावर स्थानिक दैनिक दिव्य भास्करने सीआर पाटील यांचा मोबाइल क्रमांक ठळकपणे आपल्या वृत्तपत्राच्या पहिल्या पानावर प्रसिद्ध केला होता. त्यामुळे विजय रुपाणी सरकारचा रोष या माध्यम समुहाने ओढवून घेतला होता.

या वर्तमानपत्राचे एक संपादक औम गौड यांनी न्यू यॉर्क टाइम्समध्ये ‘द गंगा इज रिटर्निग द डेड, इट डज नॉट’ या शीर्षकाचा एक लेख लिहिला होता. या लेखात मोदी सरकारच्या कोविड परिस्थिती हाताळण्यावरून वाभाडे काढण्यात आले होते.

याच बरोबर काही दिवसांपूर्वी द वायरसह जगातील १६ वृत्तसंस्थांनी उघडकीस आणलेल्या पेगॅसिस हेरगिरी प्रकरणाला दै. भास्करने ठळक प्रसिद्धी दिली होती.

मूळ बातमी

COMMENTS

WORDPRESS: 0
DISQUS: 0