काश्मीर पंडिताच्या हत्येनंतर खोऱ्यात सरकारविरोधात निदर्शने

काश्मीर पंडिताच्या हत्येनंतर खोऱ्यात सरकारविरोधात निदर्शने

श्रीनगरः मध्य काश्मीरमधील बडगाम जिल्ह्यात गुरुवारी राहुल भट या सरकारी कर्मचाऱ्याची भर कार्यालयात जाऊन दहशतवाद्यांनी हत्या केली. या घटनेनंतर शुक्रवारी

शिक्षित व श्रीमंत कुटुंबात घटस्फोट जास्त – सरसंघचालक
सुवर्णवेध
एसबीआयने १ लाख २३ हजार कोटींची कर्जे राईट ऑफ केली

श्रीनगरः मध्य काश्मीरमधील बडगाम जिल्ह्यात गुरुवारी राहुल भट या सरकारी कर्मचाऱ्याची भर कार्यालयात जाऊन दहशतवाद्यांनी हत्या केली. या घटनेनंतर शुक्रवारी बडगाम जिल्ह्यात व जम्मू-काश्मीरमधील अन्य भागांमधील काश्मीर पंडितांमध्ये आक्रोश दिसून आला. अनेक सरकारी कर्मचारी संघटना व राजकीय पक्षांनी राहुल भट यांच्या हत्येचा निषेध केला. काही ठिकाणी या संघटनांनी रास्ता रोकोही केला. कर्मचारी प्रशासनाच्या अपयशाबाबत घोषणा देत होते. निदर्शनात मोठ्या प्रमाणात काश्मीर पंडितही जमा झाले होते. ही हत्या लष्कर-ए-तय्यबा या दहशतवादी संघटनेच्या दोन दहशतवाद्यांनी केल्याचे पालिसांनी सांगितले. या हत्येप्रकरणी अद्याप कोणालाही अटक करण्यात आलेली नाही.

दरम्यान शुक्रवारी काश्मीर पंडितांचा आक्रोश पाहून प्रशासनाने एसआयटी चौकशीचे आदेश दिले. त्याच बरोबर राहुल भट यांच्या पत्नीला सरकारी नोकरीही देण्याचे जाहीर करण्यात आले. भट यांच्या कुटुंबियांना आर्थिक मदत व मुलांचे शिक्षणही प्रशासनाकडून करण्यात येणार आहे.

३५ वर्षीय राहुल भट हे तहसील कार्यालयात काश्मीर पंडितांना दिल्या जाणाऱ्या रोजगार योजनांवर काम करत होते. गुरुवारी दुपारी साडेचारच्या सुमारास लष्कर-ए-तय्यबाचे दोन दहशतवादी कार्यालयात घुसले. या वेळी कार्यालयात गर्दीही होती. अशा गर्दीच्या परिस्थितीत दहशतवाद्यांनी भट यांच्यावर गोळ्या झाडल्या.

भट गेले ८ वर्ष महसूल विभागात काम करत असून त्यांच्या मागे पत्नी, ५ वर्षांची मुलगी व आई-वडिल असे कुटुंब आहे. वडील काही वर्षांपूर्वी जम्मू-काश्मीर पोलिस खात्यातून निवृत्त झाले होते.

आपल्या मुलाच्या हत्येनंतर प्रतिक्रिया देताना बिट्टा भट यांनी एखाद्या व्यक्तीला त्याच्या कार्यालयात जाऊन गोळ्या मारल्या जातात याचा अर्थ काश्मीर खोऱ्यात कोणीच सुरक्षित नाही. सरकारच्या निष्काळजीपणाचे हे ज्वलंत उदाहरण असल्याचा आरोप केला. सरकारने या हत्येची त्वरित चौकशी केली पाहिजे अशीही मागणी त्यांनी केली.

राहुल भट यांचे शव त्यांच्या निवासस्थानी आणल्यानंतर मोठ्या प्रमाणात जनसमुदाय जमा झाला होता.

गेल्या सात महिन्यातील काश्मीर पंडिताची हत्या करण्याची ही दुसरी घटना असून गेल्या वर्षी ऑक्टोबर महिन्यात माखन लाल बिंद्रु यांची दहशतवाद्यांनी हत्या केली होती. ऑगस्ट २०१९ ते मार्च २०२० या काळात काश्मीर खोऱ्यात काश्मीर पंडितांसह १४ अल्पसंख्याक हिंदूंची दहशतवाद्यांनी हत्या केली आहे.

कलम ३७० केल्यानंतर अल्पसंख्याक हिंदुंवर हल्लेही वाढत आहेत. दहशतवादी व्यावसायिक, सरपंच, गटविकास पंचायतीतील सदस्यांना लक्ष्य करत आहेत.

मूळ वृत्त

COMMENTS

WORDPRESS: 0
DISQUS: 0