नवी दिल्लीः हिंदी चित्रपटसृष्टीतील एक आघाडीचा नायक सुशांत सिंह यांचा खून नव्हे तर ती त्यांनी केलेली आत्महत्याच असल्याचा अहवाल ऑल इंडिया इन्स्टिट्यूट ऑ
नवी दिल्लीः हिंदी चित्रपटसृष्टीतील एक आघाडीचा नायक सुशांत सिंह यांचा खून नव्हे तर ती त्यांनी केलेली आत्महत्याच असल्याचा अहवाल ऑल इंडिया इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्स (एम्स) ने शनिवारी दिला. या अहवालामुळे सुशांत सिंह यांची हत्या झाली हा अनेक टीव्ही न्यूजनी चालवलेला प्रचार खोडसाळ, बनावट व तपास यंत्रणांची दिशाभूल करणारा निघाला आहे.
सुशांत सिंह यांनी गळफास लावून आत्महत्याच केली आहे, त्यांना कोणत्याही प्रकारचे विष दिलेले नाही किंवा विष देऊन त्यांचा गळा आवळलेला नाही. सुशांत सिंह यांच्या गळ्याशिवाय अन्य शरीरावर कोणतीही इजा वा मारल्याच्या खुणा नाहीत, तसेच झटापट झाल्याचेही आढळलेले नाही, असे या सहा तज्ज्ञ फोरेन्सिक डॉक्टरांनी अहवालात म्हटले आहे. हा अहवाल आता सीबीआयकडे देण्यात आला आहे.
दरम्यान सुशांतच्या शरीरात कोणतेही अमली पदार्थ आढळले नाही असे मुंबई एफएसएल व एम्सच्या टॉक्सॉकॉलॉजी प्रयोगशाळेनेही म्हटले आहे. त्यांच्या गळ्याला फास लागल्याच्या खुणाच आढळल्याचे या संस्थांचे म्हणणे आहे.
मुंबई पोलिसांचा दावा खरा ठरला
सुशांतने आत्महत्याच केली होती असा दावा मुंबई पोलिसांकडून पहिल्यांदाच झाला होता. पण तरीही भाजपच्या राजकीय दबावातून हे प्रकरण बिहार पोलिसांकडे नेण्याचा व तेथून ते सीबीआयकडे सोपवण्यात आले होते.
मूळ बातमी
COMMENTS