श्रीनगरमध्ये दोन शिक्षकांची दहशतवाद्यांकडून हत्या

श्रीनगरमध्ये दोन शिक्षकांची दहशतवाद्यांकडून हत्या

श्रीनगरः शहरातील ईदगाह भागात गुरुवारी दहशतवाद्यांनी सरकारी शाळेतील दोन शिक्षकांची गोळ्या घालून हत्या केली. या शिक्षकांची नावे सतिंदर कौर व दीपक चंद अश

उना प्रकरणातील खटले मागे न घेतल्यास, मेवानींचा बंदचा इशारा
काश्मीरात भाजप नेत्यांकडे अजूनही सरकारी निवासस्थाने
गृहखात्याने एनपीआरमध्ये आधार क्रमांकाचीही अट घातली होती

श्रीनगरः शहरातील ईदगाह भागात गुरुवारी दहशतवाद्यांनी सरकारी शाळेतील दोन शिक्षकांची गोळ्या घालून हत्या केली. या शिक्षकांची नावे सतिंदर कौर व दीपक चंद अशी असून सतिंदर कौर बॉइज हायर सेकंडरी शाळेचे मुख्याध्यापक आहेत. ही घटना सकाळी ११च्या सुमारास घडली. काही दहशतवादी संगम ईदगाह भागातल्या शाळेत घुसले व त्यांनी या दोन शिक्षकांवर जवळून गोळ्या झाडल्या. त्यात दोघेही जागीच ठार झाले.

गेल्या तीन दिवसांतील काश्मीरी नागरिकांची हत्या करण्याची ही पाचवी घटना आहे. या पैकी चार घटना श्रीनगरमध्येच घडल्या आहेत.

५ ऑक्टोबरला एक काश्मीरी पंडित व्यावसायिक माखन लाल बिंद्रू यांच्यासहित तीन जणांनी दहशतवाद्यांनी हत्या केली होती. त्या नंतरची गुरुवारची घटना आहे.

त्या आधी दहशतवाद्यांनी फळविक्रेता वीरेंद्र पासवान, बांदीपोरा टॅक्सी स्टँड असो.चे अध्यक्ष मोहम्मद शफी यांना ठार मारले होते.

काश्मीरमधील अल्पसंख्याक नागरिकांना विशेष करून लक्ष्य करणे व त्यातून या प्रदेशात भय पसरवणे व धार्मिक तणाव निर्माण करण्याचा दहशतवाद्यांचा प्रयत्न असल्याचे जम्मू व काश्मीरचे पोलिस प्रमुख दिलबाग सिंह यांनी सांगितले. गेले काही दिवस अल्पसंख्याक समुदायाचे ज्येष्ठ नागरिकांवर हल्ले करण्याचे दहशतवाद्यांचे प्रयत्न दिसल्याचेही त्यांनी सांगितले. हे नागरिक निष्पाप असून त्यांचा कोणत्याही घटनांशी संबंध नसतानाही दहशतवादी काश्मीरमधील शांतता भंग करण्यासाठी प्रयत्न करत असल्याचे सिंह यांचे म्हणणे आहे.

मूळ बातमी

COMMENTS

WORDPRESS: 0
DISQUS: