प्रशांत किशोर, पवन वर्मा यांची जेडीयूतून हकालपट्‌टी

प्रशांत किशोर, पवन वर्मा यांची जेडीयूतून हकालपट्‌टी

नवी दिल्ली : वादग्रस्त नागरिकत्व दुरुस्ती कायद्यावरून बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांच्याशी संघर्ष झाल्यानंतर जेडीयूचे दोन नेते प्रशांत किशोर व पव

भाजपला राष्ट्रवादीने रोखले
सुवेंदू अधिकारी यांना निवडणूक आयोगाची नोटीस
फडणवीसांची बखर – १ : भाजप नेतृत्वाचा प्रवास

नवी दिल्ली : वादग्रस्त नागरिकत्व दुरुस्ती कायद्यावरून बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांच्याशी संघर्ष झाल्यानंतर जेडीयूचे दोन नेते प्रशांत किशोर व पवन वर्मा यांची बुधवारी पक्षातून हकालपट्‌टी करण्यात आली.

परराष्ट्र खात्यात नोकरी केलेले पवन वर्मा हे जेडीयूचे सरचिटणीस होते तर प्रशांत किशोर हे पक्षाचे निवडणूक व्यूहसल्लागार होते. या दोघांनी पक्षाचे अध्यक्ष नितीश कुमार यांना वादग्रस्त नागरिकत्व दुरुस्ती कायद्याला दिलेल्या समर्थनार्थ काही प्रश्न विचारले होते. या तिघांमध्ये काही दिवस सोशल मीडियातून आरोप-प्रत्यारोपही सुरू होते. जेडीयूची भूमिका देशाच्या राज्यघटनेतील मूल्यांना मानणारी असून मोदी सरकारचा नागरिकत्व कायदा हा आपल्या पक्षाच्या ध्येयधोरणाशी व राज्यघटनेतील मूल्यांशी प्रतारणा करणारा असल्याचे मत प्रशांत किशोर व पवन वर्मा यांचे होते. आणि त्यावर या दोघांकडून नितीश कुमार यांच्यावर दबाव आणला जात होता.

बुधवारी या दोन नेत्यांची हकालपट्‌टी करताना पक्षाचे मुख्य सरचिटणीस के. सी. त्यागी यांनी पवन वर्मा व प्रशांत किशोर या दोघांनी पक्षाची शिस्त मोडली असून या दोन नेत्यांनी पक्षाध्यक्षाविरोधात द्रोहही केल्याचा आरोप केला आहे.

त्यागी यांनी या पत्रात प्रशांत किशोर हे अनेक दिवस स्वतंत्रपणे काम करत होते. ते विरोधी पक्षातील नेते केजरीवाल, ममता बॅनर्जी, जगन रेड्‌डी यांच्यासाठीही काम करत असल्याचा आरोप केला आहे.

दोन दिवसांपूर्वी प्रशांत किशोर यांच्या एका आरोपाला उत्तर देताना नितीश कुमार यांनी भाजपचे बडे नेते अमित शहा यांच्या म्हणण्यानुसार प्रशांत किशोर यांना जेडीयूत घेतल्याचे विधान केले होते. त्यावर प्रशांत किशोर यांनी नितीश कुमार हे खोटे बोलत असल्याचा प्रतिआरोप केला होता.

पवन वर्मा यांचेही नितीश कुमार यांच्याशी नागरिकत्व दुरुस्ती कायद्यावरून बिनसले होते. वर्मा यांच्याकडून ट्विटरवर रोज हल्ला केला जात होता. त्यावर नितीश कुमार यांनी पक्षात तुम्हाला कोणी बांधून ठेवलेले नाही, ज्याला जायचे आहे त्याने बाहेर जावे असे उत्तर दिले होते.

जेडीयूतील हकालपट्‌टीबाबत पवन कुमार, व प्रशांत किशोर या दोन्ही नेत्यांनी नितीश कुमार यांचे आभार मानले असून त्यांच्या पुढील राजकीय प्रवासास शुभेच्छा दिल्या आहेत.

मूळ बातमी

COMMENTS

WORDPRESS: 0
DISQUS: