नवी दिल्ली: उत्तराखंडमधील जिम कॉर्बेट राष्ट्रीय उद्यानाचे नाव बदलून ते रामगंगा राष्ट्रीय उद्यान असे केले जाण्याची शक्यता आहे. या संरक्षित वनक्षेत्रातू
नवी दिल्ली: उत्तराखंडमधील जिम कॉर्बेट राष्ट्रीय उद्यानाचे नाव बदलून ते रामगंगा राष्ट्रीय उद्यान असे केले जाण्याची शक्यता आहे. या संरक्षित वनक्षेत्रातून वाहणाऱ्या नदीच्या नावावरून राष्ट्रीय उद्यानाला नाव दिले जाणार आहे.
एएनआय या वृत्तसंस्थेने दिलेल्या बातमीनुसार, केंद्रीय वन व पर्यावरणमंत्री अश्विनी कुमार चौबे यांनी ३ ऑक्टोबर रोजी जिम कॉर्बेट राष्ट्रीय उद्यानाला भेट दिली असे राष्ट्रीय उद्यानाच्या संचालकांनी सांगितले. राष्ट्रीय उद्यानाचे नाव बदलून ते रामगंगा राष्ट्रीय उद्यान असे केले जाईल, असे मंत्र्यांनी भेटीदरम्यान सांगितल्याचे, संचालकांनी नमूद केले.
जिम कॉर्बेट राष्ट्रीय उद्यान ५२०हून अधिक चौरस किलोमीटर क्षेत्रात पसरलेले आहे. यामध्ये अनेक डोंगर, जलाशय, दलदली, गवताळ प्रदेश आहेत. हे भारतातील पहिले राष्ट्रीय उद्यान आहे. १९३५ मध्ये हे क्षेत्र राष्ट्रीय उद्यान म्हणून घोषित करण्यात आले. तेव्हा त्याचे नाव हेली नॅशनल पार्क असे होते. ब्रिटिश राजवटीतील हेली या गव्हर्नरच्या नावावरून राष्ट्रीय उद्यानाला हे नाव देण्यात आले होते. राष्ट्रीय उद्यानाच्या वेबसाइटवरील माहितीनुसार, स्वातंत्र्यप्राप्तीनंतर १९५२ ते १९५७ या काळात हे राष्ट्रीय उद्यान रामगंगा राष्ट्रीय उद्यान म्हणून ओळखले जात होते.
नावाजलेले ब्रिटिश शिकारी तसेच निसर्गतज्ज्ञ एडवर्ड जेम्स कॉर्बेट यांच्या मृत्यूनंतर एक वर्षाने म्हणजेच १९५६ मध्ये राष्ट्रीय उद्यानाला जिम कॉर्बेट असे नाव देण्यात आले.
१९७३ मध्ये जिम कॉर्बेट राष्ट्रीय उद्यानाची निवड ‘प्रोजेक्ट टायगर’ या भारतातील व्याघ्र संरक्षण कार्यक्रमाचे लाँचपॅड म्हणून या राष्ट्रीय उद्यानाची निवड करण्यात आली. हा भारतातील पहिले व्याघ्र अभयारण्य म्हणून जाहीर करण्यात आले. गेल्या वर्षीच्या गणनेनुसार, या क्षेत्रात सुमारे २५२ वाघ आहेत. त्यापूर्वीच्या वर्षी जिम कॉर्बेट राष्ट्रीय उद्यानातील वाघांची संख्या केवळ २१ होती.
हे राष्ट्रीय उद्यान हत्ती, वाघ, चित्ते, हरणे, निलगायी, अस्वले, बिबटे, सांबर यांच्या अनेक प्रजातींचा अधिवास आहे. या वनक्षेत्रात निवासी तसेच स्थलांतरित पक्ष्यांच्या ५८०हून अधिक प्रजाती वास करतात.
जिम कॉर्बेट नॅशनल पार्क राजाजी टायगर रिझर्व्हसह वर्षभर खुले राहील, अशी उत्तराखंड सरकारने नुकतीच केली आहे. यापूर्वी राष्ट्रीय उद्याने पावसाळ्याचे पाच महिने (जून ते नोव्हेंबर) बंद ठेवली जात.
राज्यातील पर्यटनाला चालना देण्यासाठी हा निर्णय करण्यात आल्याचे सरकारने सांगितले असले, तरी तज्ज्ञांनी याबाबत चिंता व्यक्त केली आहे. पावसाळ्यात या क्षेत्रातील नद्यांना पूर येतात. त्यामुळे जंगल सफारीच्या मार्गात पाणी भरते. त्याचप्रमाणे हा काळ अनेक प्राण्यांसाठी प्रजननाचा असतो. यात व्यत्यय आल्यास वन्यप्राणी व मानवांमध्ये संघर्ष निर्माण होऊ शकतो, असे तज्ज्ञांचे म्हणणे आहे.
COMMENTS