नवी दिल्लीः आंतरराष्ट्रीय तेलबाजारात इंधनाच्या किमतीत वाढ आल्यानंतर बुधवारी घरगुती सिलेंडरच्या दरात १५ रु.ची वाढ करण्यात आली. त्याच बरोबर पेट्रोलच्या
नवी दिल्लीः आंतरराष्ट्रीय तेलबाजारात इंधनाच्या किमतीत वाढ आल्यानंतर बुधवारी घरगुती सिलेंडरच्या दरात १५ रु.ची वाढ करण्यात आली. त्याच बरोबर पेट्रोलच्या प्रतिलीटर दरात ३० पैसे व डिझेलच्या प्रतिलीटर दरात ३५ पैशांची वाढ झाली.
गेल्या जुलैपासून घरगुती सिलेंडरच्या दरात ९० रु.नी वाढ झाली आहे. दिल्लीत व मुंबईत घरगुती सिलेंडरची किंमत ८९९.५० रु. तर कोलकातामध्ये ९२६ रु. झाली आहे.
सरकारने गेल्या काही महिन्यात देशातील बहुतेक शहरांमधील स्वयंपाकाच्या गॅस सिलेंडर मिळणारी सबसिडी बंद केली असून सर्वसामान्य व्यक्ती वर्षभरात १२ सिलेंडर सबसिडीच्या दरात घेत आहे, त्यांना या दरवाढीची झळ बसली आहे. त्याच बरोबर मोफत उज्ज्वला योजनाचे लाभार्थ्यांनाही बाजारपेठेतील दरानुसार सिलेंडर खरेदी करावा लागत आहे.
५ किलोग्रॅम एलपीजी सिलेंडरची किंमत आता ५०२ रु. इतकी झाली.
दरम्यान पेट्रोल व डिझेलच्याही दरात सातत्याने वाढ होत आहे, या वाढीवर पेट्रोलियम मंत्री हरदीप पुरी यांनी कोणतीही टिप्पण्णी करण्यास नकार दिला.
देशात बहुसंख्य ठिकाणी पेट्रोलच्या किंमतीने शंभरी गाठली आहे. तर म. प्रदेश, राजस्थान, ओदिशा, आंध्र प्रदेश व तेलंगण राज्यातील अनेक शहरांत डिझेलनेही शंभरी पार केली आहे.
मूळ बातमी
COMMENTS