पत्रकार, नाटककार जयंत पवार यांचे निधन

पत्रकार, नाटककार जयंत पवार यांचे निधन

ज्येष्ठ पत्रकार, नाटककार आणि लेखक जयंत पवार यांचे सकाळी निधन झाले. ते ६१ वर्षांचे होते. जयंत पवार यांना शनिवारी रात्री २ वाजण्याच्या सुमारास अस्वस्

मुलींच्या विवाहाची किमान वयोमर्यादा बदलणार
कलाकार गप्प का आहेत?
भाषेची हिंसा आणि लोकतांत्रिक प्रत्युत्तर

ज्येष्ठ पत्रकार, नाटककार आणि लेखक जयंत पवार यांचे सकाळी निधन झाले. ते ६१ वर्षांचे होते.

जयंत पवार यांना शनिवारी रात्री २ वाजण्याच्या सुमारास अस्वस्थ वाटू लागल्याने रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. उपचारादरम्यान त्यांचे निधन झाले.

त्यांच्या पश्चात त्यांची पत्नी पत्रकार, लेखिका संध्या नरे-पवार  व मुलगी असा परिवार आहे.

परखड भाष्यकार, नाटककार आणि लेखक अशी जयंत पवार यांची ख्याती होती. ‘काय डेंजर वारा सुटलाय’ या नाटकासाठी जयंत पवार यांना सर्वोत्कृष्ट लेखनाचे प्रथम पारितोषिक मिळाले होते. २०१४च्या जानेवारी महिन्यात महाड येथे झालेल्या १५ व्या कोकण मराठी साहित्य परिषदेच्या साहित्य संमेलनाचे अध्यक्षपद जयंत पवार यांनी भूषवले होते. ‘फिनिक्सच्या राखेतून उठला मोर’ या कथासंग्रहासाठी २०१२ चा साहित्य अकादमी पुरस्काराने त्यांना गौरवण्यात आले होते.

जयंत पवार यांनी अंधातर, टेंगशेच्या स्वप्नात ट्रेन, काय डेंजर वारा सुटलाय, पाऊलखुणा, बहुजन संस्कृतिवाद आणि लेखक, दरवेशी, फिनिक्सच्या राखेतून उठला मोर, माझे घर, वंश, शेवटच्या बीभस्ताचे गाणे, होड्या, वरण भात लोन्च्या अन कोण काय कोन्च्या असे साहित्य लिहिले आहे.

COMMENTS

WORDPRESS: 0
DISQUS: 0