एप्रिलमध्ये रजनीकांत यांच्या राजकीय एंट्रीची शक्यता

एप्रिलमध्ये रजनीकांत यांच्या राजकीय एंट्रीची शक्यता

नवी दिल्ली : तामिळ चित्रपटातील सुपरस्टार रजनीकांत येत्या एप्रिलमध्ये आपल्या नव्या पक्षाची घोषणा करतील अशी शक्यता आहे. दोन वर्षांपूर्वी त्यांनी राजकारण

मुस्लिम असल्याच्या संशयावरून वृद्धाचा कथित मारहाणीत मृत्यू
भाजपचा यू टर्न : ‘कुंभ मेळा प्रतिकात्मक ठेवा’
महाजनादेशाचा अन्वयार्थ

नवी दिल्ली : तामिळ चित्रपटातील सुपरस्टार रजनीकांत येत्या एप्रिलमध्ये आपल्या नव्या पक्षाची घोषणा करतील अशी शक्यता आहे. दोन वर्षांपूर्वी त्यांनी राजकारणात येण्याचे संकेत दिले होते. ते लोकसभा निवडणुकीत आपल्या पक्षाची घोषणा करतील असेही बोलले जात होते. पण रजनीकांत यांनी लोकसभा निवडणुकांपासून स्वत:ला दूर ठेवले होते. पण आता ते आपल्या राजकीय पक्षाची घोषणा करू शकतात, अशी माहिती रजनीकांत यांचे राजकीय सल्लागार तमिलारुवी मनियन यांनी दिली आहे.

रजनीकांत एप्रिलच्या १४ तारखेला किंवा त्यानंतर केव्हाही आपल्या राजकीय पक्षाची घोषणा करू शकतात, त्यावेळी ते एक पत्रकार परिषद घेतील व ऑगस्टमध्ये एक प्रचंड जनसभा घेतील असेही मनियन यांनी सांगितले. सप्टेंबरनंतर रजनीकांत तामिळनाडू राज्यव्यापी दौरा काढतील व या दौऱ्यात ते समाजातील विविध घटकांशी चर्चा करतील, त्यांना भेटतील असेही मनियन यांनी सांगितले.

राष्ट्रीय स्तरावर रजनीकांत एनडीए घटकदलात सामील होतील अशी शक्यता मांडली जात असताना मनियन यांनी मात्र ती फेटाळून लावली पण एनडीएमधील पीएमके पक्ष आमच्यासोबत येईल असे त्यांनी सांगितले. २०१४मध्ये एनडीएला घटकदलात पीएमके, विजयकांत यांचा डीएमडीके व वायको यांचा एमडीएमके असे पक्ष सामील झाले होते व या सर्वांनी राज्यातील १९ टक्के मते मिळवली होती. त्या पद्धतीचा प्रयत्न असेल असे मनियन यांनी सांगितले.

१९९६मध्येच रजनीकांत यांची राजकारणात शिरण्याची इच्छा प्रकट झाली होती. त्यावेळी त्यांनी डीएमके व तमिळ मनिला काँग्रेस युतीला पाठिंबा दिला होता. पण प्रत्यक्ष राजकारणात उतरण्याबाबत त्यांनी अनेक वर्षे चालढकल केली. मात्र मार्च २०१८मध्ये रजनीकांत यांनी आपल्या पहिल्या राजकीय भाषणात तामिळनाडूत ‘एमजीआर सत्ता’ आणण्याची भाषा केली होती.

मूळ बातमी

COMMENTS

WORDPRESS: 0
DISQUS: 0