गाडीला हात लावला म्हणून दलित युवकाला मारहाण

गाडीला हात लावला म्हणून दलित युवकाला मारहाण

विजयपुराः कर्नाटकातल्या विजयपुरा जिल्ह्यात मिनाजी गावांत उच्च जातीच्या एका युवकाच्या मोटार सायकलला हात लावला म्हणून एका दलित युवकाला व त्याच्या कुटुंब

अनुसूचित जाती आणि जमातीच्या विद्यार्थ्यांना संशोधन शिष्यवृत्ती मिळवण्यासाठी ‘नेट’ आवश्यक
लैंगिकता आणि स्त्रीवादी राजकारण
‘दलित दहशतवाद’ : एनआयएचा शोध

विजयपुराः कर्नाटकातल्या विजयपुरा जिल्ह्यात मिनाजी गावांत उच्च जातीच्या एका युवकाच्या मोटार सायकलला हात लावला म्हणून एका दलित युवकाला व त्याच्या कुटुंबाला जमावाने काठ्या व दांडक्याने बेदम मारहाण केल्याची घटना शनिवारी घडली. या प्रसंगाचा व्हीडिओ प्रसिद्ध झाल्यानंतर ही घटना सर्वांना समजली.

मारहाण झालेल्या युवकाचे नाव काशीनाथ तलवार (२८) असून तो रोजंदारीवर काम करतो. शनिवारी सकाळी मिनाजगी या गावातून तो आपल्या वडिलांना घेऊन कामावर जात होता. गावाच्या बाहेर चेन्नमा सर्कलला एका उभ्या केलेल्या मोटार सायकलला त्याने हात लावला म्हणून त्याला मारहाण करण्यात आली.

जमावाने या युवकाला निर्वस्त्र करूनही बेदम मारले. या युवकाचा चेहरा जमिनीवर दाबण्यात आला व त्याला जमावाकडून लाथाबुक्क्या मारल्या जात होत्या. काठ्या-दांडुक्यानेही मारहाण केली जात होती. जमावाने युवकाच्या कुटुंबियांनाही बेदम मारहाण केली.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार या दलित युवकाने एका उच्चजातीच्या तरुणाच्या मोटार सायकलला हात लावल्याने जमाव संतप्त झाला व त्यांनी मारहाण करण्यास सुरूवात केली. या जमावात १३ जण होते.

दरम्यान या घटनेनंतर पीडित युवकाच्या वडिलांनी तालिकोट येथील पोलिस ठाण्यात जाऊन तक्रार नोंद केली. पोलिसांनी या प्रकरणी अनु, जाती, जमाती कायदा व आयपीसी कलम १४३, १४७, ३२४, ३५४, ५०४, ५०६, १४९ अंतर्गत मोटार सायकलची मालकी असलेला युवक व अन्य १३ जणांवर गुन्हे दाखल केले आहेत.

जमावाने जातीवाचक शिव्या दिल्या आणि माझ्या मुलाबरोबर त्याची पत्नी व मुलीलाही जमावाने मारहाण केल्याचा आरोप पीडित काशीनाथचे वडील व्यंकप्पा यांनी केला.

दरम्यान गावातल्या काही ग्रामस्थांनी काशीनाथ तलवार यांच्या कुटुंबियाच्याविरोधातही पोलिस तक्रार केली आहे. काशीनाथ याने स्वतःच कपडे काढले व त्याने दोन मुलींकडे पाहून अश्लिल हावभाव केले, असा आरोप गावकर्यांचा आहे.

मूळ बातमी

COMMENTS

WORDPRESS: 0
DISQUS: 0