नवी दिल्लीः कर्नाटक सरकारने ८ वी च्या अभ्यासक्रमात विनायक दामोदर सावरकर यांच्यासंदर्भातील समाविष्ट केलेल्या एका धड्यातील परिच्छेद सोशल मीडियात व्हायरल
नवी दिल्लीः कर्नाटक सरकारने ८ वी च्या अभ्यासक्रमात विनायक दामोदर सावरकर यांच्यासंदर्भातील समाविष्ट केलेल्या एका धड्यातील परिच्छेद सोशल मीडियात व्हायरल झाल्याने वाद निर्माण झाला आहे. या परिच्छेदात सावरकर ज्या अंदमानच्या जेलमध्ये बंदीवान होते, ती खोली संपूर्णपणे बंदिस्त होती. तरीही या खोलीत एक बुलबुल पक्षी रोज येत असे आणि या पक्षाच्या पंखावर बसून सावरकर दरदिवशी आपल्या मायभूमीला भेट देत असल्याचे म्हटले आहे.
हा धडा के. टी. गट्टी यांनी लिहिला असून हा धडा एक प्रवास वर्णन आहे. यात लेखकाने अंदमान कारागृहाला पूर्वी भेट दिली होती. या भेटीतला अनुभव लेखकाने काव्यात्मक सांगण्यासाठी बुलबुलचा संदर्भ घेतला आहे.
सावरकरांवरचा धडा शालेय पाठ्यपुस्तकात घेण्याचा निर्णय राज्य सरकारने नेमलेल्या चक्रतीर्थ समितीने घेतला होता. या समितीने आठवीच्या कन्नड भाषा या विषयात ब्लड ग्रुप नावाचा धडा वगळून के. टी. गट्टी यांचा ‘कलावनू गेड्डावरू’ हा सावरकरांवरचा धडा समाविष्ट करण्याचा निर्णय घेतला. त्यावर वाद सुरू आहे.
COMMENTS