पदाचा दुरुपयोगः माजी सरन्यायाधीश रमणांविरोधात तक्रार

पदाचा दुरुपयोगः माजी सरन्यायाधीश रमणांविरोधात तक्रार

नवी दिल्लीः नुकतेच सेवानिवृत्त झालेले सरन्यायाधीश एन. व्ही. रमणा यांनी हैदराबादस्थित इंटरनॅशनल आर्बिट्रेशन अँड मीडिएशन सेंटर (आयएएमसी) या संस्थेच्या स

सरन्यायाधीश बोबडे आणि शेतकरी संघटना
सुवर्ण पदक विजेत्या मुलीने सरन्यायाधीशांच्या हस्ते पदक घेणे नाकारले
संसदेत सखोल, अभ्यासू चर्चा होत नाहीतः सरन्यायाधीशांची खंत

नवी दिल्लीः नुकतेच सेवानिवृत्त झालेले सरन्यायाधीश एन. व्ही. रमणा यांनी हैदराबादस्थित इंटरनॅशनल आर्बिट्रेशन अँड मीडिएशन सेंटर (आयएएमसी) या संस्थेच्या स्थापनेत व कारभारात हस्तक्षेप केल्याचा आरोप काही वकील, मध्यस्थ व काही संस्थानी आरोप केला आहे. या प्रकरणाची चौकशी करण्यासाठी उच्चस्तरिय समिती नेमावी असे एक पत्र ६५ जणांच्या या समुहाने केंद्र सरकारला पाठवले असून आयएएमसी योजना, मालमत्ता, या संस्थेतील आर्थिक व्यवहार यांची चौकशी कॅगने करावी असेही या मंडळींचे म्हणणे आहे. आयएएमसीच्या माध्यमातून तेलंगण सरकारच्या पैशाचे व संपत्तीचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असल्याचाही आरोप पत्रात करण्यात आला आहे.

गेल्या २६ ऑगस्टला रमणा सरन्यायाधीशपदावरून निवृत्त झाले होते. या पदावर ते १६ महिने होते.

रमणा यांनी आयएएमसीच्या कारभारात ढवळाढवळ करून आपल्या पदाचा गैरवापर केला, त्यांनी आपल्या खासगी संबंधांतून या संस्थेला सार्वजनिक धर्मार्थ ट्रस्टमध्ये रुपांतरीत केले. १८ डिसेंबर २०२१ रोजी आयएएमसीच्या उद्घाटनवेळी ही संस्था सार्वजनिक ट्रस्ट असल्याचे लपवण्यात आले होते. पण सरन्यायाधीशपदी असताना रमणा सतत आयएएमसीचा प्रचार करत होते, या संस्थेला अधिक पुढे आणण्यासाठी ते आपल्या पदाचा वापर करत होते, असे आरोप पत्रात करण्यात आले आहेत. रमणा यांच्या दबावामुळे तेलंगण सरकारने ५० कोटी रु.ची मदत आयएएमसीला केल्याचेही आणि या संस्थेला हैदराबाद शहराच्या नजीक २५० कोटी रु.चा पाच एकर भूखंडही देण्यात आला व तेथे ही संस्था उभी आहे, असे या पत्रात नमूद करण्यात आले आहे. सार्वजनिक कंपन्यांचे १० कोटी रु.हून अधिक रकमेचे वाद आयएएमसीकडून सोडवण्यात येतील असा प्रस्तावही मंजूर करून घेण्यात आल्याचे या पत्रात नमूद करण्यात आले आहे. आयएएमसीच्या प्रस्तावात मध्यस्थ म्हणून आयपीएलचे माजी अध्यक्ष ललित मोदी व त्यांच्या आई बीना मोदी यांच्यातील संपत्तीच्या वादात आयएएमसीने काम करावे असे नमूद करण्यात आले आहे.

आयएएमसीच्या उद्घाटन कार्यक्रमांत रमणा यांच्याशिवाय सर्वोच्च न्यायालयातील न्यायाधीश एल. नागेश्वर राव, न्या. हिमा कोहली तेलंगणचे मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव, मंत्रिमंडळातील मंत्री, सनदी अधिकारी उपस्थित होते. नंतर या संस्थेच्या ट्रस्टी न्या. हिमा कोहली, तेलंगणचे कायदा मंत्री ए. इंद्रकरण रेड्डी पदेन यांना करण्यात आले. २० ऑगस्ट २०२१ रोजी या ट्रस्टची कागदपत्रे तयार करण्यात आली तेव्हा न्या. कोहली तेलंगणच्या मुख्य न्यायाधीश पदी होत्या. आयएएमसीच्या आजीवन ट्रस्टी म्हणून न्या. एल. नागेश्वर राव, न्या. आरव्ही रवींद्रन यांना नेमण्यात आले असून राव अजूनही न्यायिक सेवेत आहेत तर रवींद्रन हे निवृत्त झाले आहेत.

मूळ वृत्त

COMMENTS

WORDPRESS: 0
DISQUS: 0