‘निग्रह सोडला तर सगळं काही गमावलंय’

‘निग्रह सोडला तर सगळं काही गमावलंय’

काश्मीर सर्व बाजूंनी कोंडलं गेलंय. श्रीनगरमधील झीरो ब्रीज ते विमानतळ या मार्गावर तुरळक वाहतूक दिसतेय. काही वाहनेच रस्त्यावरून जाताना दिसतायेत. पण शहरा

काश्मीरमधील पंचायत पोटनिवडणुका अनिश्चित काळ स्थगित
कलम३७० आणि नीच मानसिकता
काश्मीर अशांत, जनतेची निदर्शने

काश्मीर सर्व बाजूंनी कोंडलं गेलंय. श्रीनगरमधील झीरो ब्रीज ते विमानतळ या मार्गावर तुरळक वाहतूक दिसतेय. काही वाहनेच रस्त्यावरून जाताना दिसतायेत. पण शहरात अन्य ठिकाणी नागरिकांना रस्त्यावर पडता येत नाही. जे कोणी रुग्ण असतील त्यांना कर्फ्यूतून रुग्णालयापर्यंत जाण्यास मुभा मिळते.

ओमर अब्दुल्ला, मेहबुबा मुफ्ती किंवा सज्जाद लोन यांच्यापर्यंत जाता येत नाही. त्यांना साधा संदेशही पाठवता येत नाही.

काश्मीरात सर्व जिल्ह्यांमध्ये संचारबंदी आहे ती अत्यंत कठोरपणे राबवली जात आहे. राज्यातील सुमारे ८० लाख जनतेला कैदेत ठेवल्यासारखी परिस्थिती आहे. असे पूर्वी कधी घडले नव्हते.

सध्या अन्नधान्याची टंचाई नाही. माझे प्रशासनातले ओळखीचे काही जण सांगतायेत की नागरी सुविधा हाताळणाऱ्या अधिकाऱ्यांना सॅटेलाइट फोन देण्यात आले आहेत. त्याशिवाय राज्यात कसलीच दूरसंपर्क यंत्रणा कार्यरत नाही.

डिश टीव्ही दिसत नाही. केबल सर्विस बंद केली आहे. त्यामुळे आपल्या राज्यात, देशात काय घडतेय याची कणभर माहिती नागरिकांना मिळत नाही. रेडिओ काही तास चालू होता पण तो बंद पडला. बहुसंख्यांना दूरदर्शनवर अवलंबून राहावं लागतंय. देशातील एकाही मीडियाला काश्मीरच्या आत येऊ दिलं गेलेलं नाही.

एलडी रुग्णालय त्याच्या क्षमतेपेक्षा अधिक रुग्णांनी भरून गेलं आहे. महिला रुग्णांची संख्या अधिक पाहता व एकूण परिस्थिती पाहता त्यांना अगोदर दाखल करून घेतलं होतं. काही नागरिकांनी रुग्णालयाच्या आवारात लंगर सुरू केले आहेत.

काश्मीरी नागरिक एका मोठ्या धक्क्यात आहे. ते बधिर झाले आहेत. त्यांच्या पुढे काय वाढून ठेवले आहे याची त्यांना कल्पना नाही. प्रत्येक जण शोकात आहेत. प्रत्येकाच्या मनात आपण काही तरी गमावल्याची भावना आहे.

३७० कलमाव्यतिरिक्त नागरिकांची काय भावना आहे हे मी जाणून घेण्याचा प्रयत्न केला. सर्वांनाच आपल्या राज्याचा दर्जा गेल्याचे अपार दु:ख झाले आहे. ७० वर्षात पहिल्यांदाच आपला एवढा विश्वासघात भारत सरकारकडून झाल्याची त्यांची भावना आहे.

काही स्थानबद्ध नेत्यांनी आपली सुटका करून नागरिकांना शांत राहण्याचे आवाहन केल्याचे टीव्ही वृत्तवाहिन्यांवरून कळालं. असंही कळतंय की सरकारची खोऱ्यात ८ ते १० हजार मृत्यू पाहण्याची तयारी आहे.

माझी सर्वांना विनंती आहे की नागरिकांनी शांत राहावं, त्यांनी जिवंत राहावं आपल्याला लढा द्यायचाय, संघर्ष करायचाय.

चौकाचौकात गस्त घालणाऱ्या सुरक्षा दलांची देहबोली अत्यंत आक्रमक आहे. जम्मू व काश्मीर पोलिसांना पूर्णत: बाजूला केलं गेलं आहे. ‘तुम्हाला (पोलिसांना) तुमची आता जागा दाखवून देऊ, असं सुरक्षा दले म्हणत असल्याचे मला एकाने सांगितले.

काश्मीरमध्ये ज्यांना प्रवास करायचा आहे त्यांनी प्रवास करू नये. संचारबंदी शिथिल झाली तरी परिस्थिती प्रचंड तणावपूर्ण आहे.

विमानतळावर मला काही काश्मीरी युवक भेटले. ते म्हणाले, आता आम्ही काय करायचं? मी म्हणालो, आपण सर्वांनी सर्वोच्च न्यायालयाचे दरवाजे ठोठावायचे, अन्यायाविरोधात न्यायाची मागणी करायची. राज्यातील सर्वच राजकीय पक्षांनी या घटनेचा द्रोह केलेल्या कायद्याविरोधात उभे राहायचे ठरवले आहे आणि हीच सध्या आशा आहे.

आंतरराष्ट्रीय समुदायाने या घटनेकडे डोळेझाक केली आहे. त्यांच्याकडून काही अपेक्षा करण्याची गरज नाही.

आपले दु:ख असे की, नरेंद्र मोदी व अमित शहा हे दोघेच आपली दिवसाढवळ्या चोरलेली संपत्ती आपल्याला परत देणार आहेत.

पण जे काही गमावलं ते गमावलं. सगळंच गमावलंय. पण आपला संघर्ष करण्याचा निग्रह कायम ठेवला पाहिजे आणि तो ठेवला आहेच.

ही मजकूर शाह फैजल यांच्या फेसबुकवरचा आहे.

मूळ लेख

COMMENTS

WORDPRESS: 0
DISQUS: 0