ट्रम्प यांची काश्मीरप्रश्नात मध्यस्थी करण्याची पुन्हा तयारी

ट्रम्प यांची काश्मीरप्रश्नात मध्यस्थी करण्याची पुन्हा तयारी

नवी दिल्ली : भारत-पाकिस्तानमधील तणावाचे मुख्य कारण असलेल्या काश्मीर प्रश्नात आपण मध्यस्थी करण्यास तयार असल्याचे अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी

‘हाऊडी मोदी’ : मोदींसाठी लाभदायक, पण भारतासाठी?
विदुषकांच्या हाती जगाची दोरी
ट्रम्प यांना झोपडपट्‌टी दिसू नये म्हणून भिंत बांधली

नवी दिल्ली : भारत-पाकिस्तानमधील तणावाचे मुख्य कारण असलेल्या काश्मीर प्रश्नात आपण मध्यस्थी करण्यास तयार असल्याचे अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी पुन्हा सांगितले आहे. काश्मीरमधील घडामोडीवर आपण लक्ष ठेवून आहोत आणि पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांच्याशी अनेक मुद्द्यांवर चर्चा करताना यात काश्मीरप्रश्नही  अमेरिकेकडून चर्चिला जात असल्याचे ट्रम्प यांनी मंगळवारी सांगितले.

पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांनी मंगळवारी वर्ल्ड इकॉनॉमी फोरमच्या पार्श्वभूमीवर ट्रम्प यांची दावोस येथे भेट घेतली. या भेटीनंतर प्रसारमाध्यमांशी बोलताना ट्रम्प यांनी पाकिस्तानसोबत सीमाप्रश्नांवर चर्चा केली त्यामध्ये काश्मीरप्रश्न उपस्थित करण्यात आला असे सांगितले. आम्ही मदत केल्यास पाकिस्तानला त्याचा निश्चितच फायदा होईल. इम्रान खान आपले चांगले मित्र असून दोघेही काश्मीरप्रश्नाकडे सतत जवळून पाहात असतो, असे ट्रम्प म्हणाले. आपल्या अध्यक्षपदाच्या कार्यकाळात पाकिस्तान व अमेरिकेचे संबंध सर्वाधिक दृढ झाले आहेत, असेही ते म्हणाले.

या पत्रकार परिषदेत इम्रान खान यांनी अफगाणिस्तानचा मुद्दा चर्चिला गेल्याचे सांगितले पण नंतर काश्मीर प्रश्न आमच्या चर्चेत नैसर्गिकरित्या आला. हा मुद्दा आमच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचा आहे. पण त्यात अमेरिकेने मदत केल्यास त्यातून तोडगा निघेल असे वाटते आणि हे फक्त अमेरिकाच करू शकते असे इम्रान खान यांनी सांगताच ट्रम्प यांनी ‘तुम्ही योग्य बोलला’, अशी प्रशस्ती दिली.

पाकिस्तानचे पंतप्रधानपद मिळवल्यानंतर इम्रान खान व ट्रम्प यांच्यातील ही चौथी भेट आहे आणि इम्रान खान यांच्याशी भेट घेतल्यानंतर ट्रम्प यांनी वेळोवेळी काश्मीरप्रश्नी आपण मध्यस्थी करण्यास तयार असल्याचे वक्तव्य केले आहे.

मूळ बातमी

COMMENTS

WORDPRESS: 0
DISQUS: 0