अमेरिकेत हिंसाचाराचा आगडोंब, ट्रम्प पोलिसांवर भडकले

अमेरिकेत हिंसाचाराचा आगडोंब, ट्रम्प पोलिसांवर भडकले

वॉशिंगटन/न्यू यॉर्क/अटलांटा/बैंकॉक : पोलिसांच्या अमानुष मारहाणीत कृष्णवर्णीय नागरिक जॉर्ज फ्लॉइड यांचा गुदमरून मृत्यू झाल्याप्रकरणी सहाव्या दिवशीही अम

टोनी मॉरिसन : वेदनेचं महाकाव्य लिहिणारी लेखिका
असामान्य व अतिसामान्य
‘टू किल अ मॉकिंगबर्ड’ : विवेक जागविणारी कादंबरी

वॉशिंगटन/न्यू यॉर्क/अटलांटा/बैंकॉक : पोलिसांच्या अमानुष मारहाणीत कृष्णवर्णीय नागरिक जॉर्ज फ्लॉइड यांचा गुदमरून मृत्यू झाल्याप्रकरणी सहाव्या दिवशीही अमेरिकेत ४० हून अधिक शहरांमध्ये पोलिस व ट्रम्प प्रशासनाच्या विरोधात हिंसाचार सुरू असून येथे संचारबंदी पुकारण्यात आली आहे.

सोमवारीही अमेरिकेत जागोजागी ट्रम्प प्रशासन व पोलिसांच्या विरोधात हजारो नागरिक रस्त्यावर उतरले होते. अमेरिकेच्या पोलिस व्यवस्थेत मुरलेल्या काळे-गोरे वंशवादाचा बळी जॉर्ज फ्लॉइड असल्याचे आंदोलकांचे मत होते. परिणामी हातात पोलिस प्रशासनाचा निषेध करणारे व काळे-गोरे वंशवादाला मूठमाती कधी देणार, मानवी जीवनाचे मोल प्रशासनाला केव्हा कळणार अशा आशयाचे फलक घेऊन निदर्शक ठिकठिकाणी रस्त्यावर उतरले होते. काही ठिकाणी आंदोलकांचा राग अनावर झाल्याने अनेक शहरांमध्ये बडे मॉल लुटण्यात येत होते. अनेक इमारतींना, गाड्यांना जमावाने आगी लावल्या. प्रशासनाने दिलेल्या माहितीनुसार या हिंसाचारात पाच नागरिकांचा मृत्यू झाला असून हजारो लोकांना अटक करण्यात आली आहे.

तुमची ताकद कुठेय – ट्रम्प यांचा पोलिसांना सवाल

सोमवारी डोनाल्ड ट्रम्प यांनी सर्व राज्यातल्या गव्हर्नरची बैठक घेऊन त्यांच्या कार्यपद्धतीवर टीका केली. आंदोलकांना वेळीच का आवरले नाही, तुमचे पोलिस बळ कमी पडत आहे, ते अधिक सक्रीयपणे वापरले गेले पाहिजे. हिंसाचार करणार्या एकालाही सोडू नये, सर्वांना ताब्यात घेऊन खटले दाखल करावेत, अशा सूचना ट्रम्प यांनी गव्हर्नरना दिल्याचे सीएनएनचे वृत्त आहे. ट्रम्प यांनी पोलिसांना बळाचा वापर करण्याच्याही सक्त सूचना दिल्या. अमेरिकेत उफाळलेला हा हिंसाचार हा कट्टर डाव्या विचारसरणीवाल्यांचा कट असल्याचाही आरोप त्यांनी केला.

व्हाइट हाऊससमोर जोरदार निदर्शने

फ्लॉइड यांच्या मृत्यूनंतरचा हा उद्रेक इतका भीषण होता की त्याचे लोण थेट अमेरिकेची राजधानी वॉशिंग्टनमध्ये व्हाइट हाऊसपर्यंत पोहोचले. शेकडो नागरिक व्हाइट हाऊसच्या परिसरात जमा होऊन निदर्शने करत होते. लोकांचा सरकारविरोधातील इतका क्षोभ लक्षात आल्याने अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांना व्हाइट हाउसच्या बंकरमध्ये शुक्रवारची रात्र काढावी लागली.

अमेरिकेत सहा दिवसात दिसून आलेला हा हिंसाचार गेल्या अनेक दशकांनंतर घडलेली भयंकर घटना असल्याचे सांगितले जात आहे. या हिंसाचारामुळे २० राज्यांमध्ये नॅशनल गार्डला तैनात करण्यात आले आहे.

सर्व देशात हिंसाचाराचे लोण पसरले

जॉर्ज फ्लॉइड यांचा मृत्यू मिनेसोटा राज्यातील मिनिपोलिस शहरात पोलिसांच्या अमानुष मारहाणीत झाला. हे वृत्त कळाल्याने तेथे हिंसाचार उफाळून आला आणि ते लोण पुढे लॉस एंजेलिस, शिकागो, न्यू यॉर्क, ह्युस्टन, फिलाडेल्फिया, वॉशिंग्टन डीसी, सिएटल, अटलांटा, सांता मोनिका, डेन्व्हर, बोस्टन, मेरिलँड, टेक्सास राज्यात पसरू लागले.

न्यू यॉर्कमध्ये ब्रुकलिन व विलियम्सबर्ग पुलांवरही वाहतूक आंदोलकांनी बंद पाडली. तर युनियन स्कॉयर येथे एका दोन मजले इमारतीला आग लावण्यात आली.

निदर्शक व्हाइट हाऊसच्या बाहेर होते. त्यांना हटवण्यासाठी पोलिसांनी रबर बुलेट, अश्रुधुराच्या अनेक नळकांड्या फोडल्या पण निदर्शक हटण्यास तयार नव्हते. वॉशिंग्टन शहरात निदर्शकांनी काही इमारतींच्या खिडक्या फोडल्या, मोटारींची नासधुस केली व आग लावण्याचे प्रयत्न केले. गेले दोन तीन दिवस शेकडो निदर्शक व्हाइट हाउसच्या परिसरात जमा होऊन ट्रम्प यांच्याविरोधात घोषणा देत आहे, या आंदोलकांचा तीव्र आवेश पाहून रविवारी रात्री ११ वाजताच या परिसरात संचारबंदी लागू करण्यात आली होती.

शिकागो, लॉस एंजेलिस येथीलही अनेक भागात आगी लावण्याच्या घटना घडल्या. शेकडो कारची तोडफोड करण्यात आली होती. जमावाकडून मोठी दुकाने, मॉल फोडून लुटालूट सुरू होती. सीएनएनच्या कार्यालयावर दगडफेक करण्यात आली.

वॉशिंग्टनमध्ये रविवारी परिस्थिती बिघडली होती. सीएनएनने दिलेल्या माहितीनुसार शुक्रवारी रात्रीच डोनाल्ड ट्रम्प, त्यांची पत्नी मेलानिया ट्रम्प व मुलगा बेरन या तिघांना सुरक्षिततेच्या कारणास्तव व्हाइट हाऊसमधील बंकरमध्ये हलवण्यात आले.

रविवारी दिवसभर ट्रम्प दिसले नाही पण त्यांनी ट्विटवरून देशात द्वेष व अराजक माजवल्याप्रकरणी मीडियाला दोषी धरले. तर ट्रम्प प्रशासनाने हा हिंसाचार सुनियोजित व डाव्या विचारांच्या, अराजकतावादी मंडळींनी भडकवल्याचा आरोप केला.

जगभर निदर्शने

अमेरिकेच्या पोलिस व्यवस्थेतील वंशभेद व हिंसेच्या विरोधात जगभरातल्या अनेक देशात निदर्शने झाले. न्यूझीलंडची राजधानी ऑकलंडमध्ये सोमवारी हजारो नागरिक रस्त्यावर उतरले व त्यांनी मोर्चा काढला. हा मोर्चा शहरातील अमेरिकी दुतावासाच्या बाहेर जमा झाला. आंदोलकांच्या हातात, खरा विषाणू वंशभेदाचा असल्याचे फलक होते.

रविवारी लंडनमध्ये हजारो नागरिक रस्त्यावर उतरून वंशभेदाचा धिक्कार करत होते. ब्राझीलच्या रिओ दि जानेरो शहरातल्या कामगारवस्तीत निदर्शने झाली.

कॅनडात माँट्रियलमध्ये निदर्शक व पोलिस यांच्यात चकमक उडाली. पोलिसांनी जमावाला पांगवण्यासाठी मिरची स्प्रे व अश्रुधूराच्या नळकांड्या वापरल्या.

इराणच्या सरकारी टीव्ही चॅनेलनी अमेरिकेतील हिंसाचाराची दृश्ये दाखवली. तर रशियाने अमेरिकेत मानवाधिकाराचे उल्लंघन होत असल्याची टीका केली. चीननेही अमेरिकेतील नेत्यांना हाँगकाँगविषयी मत व्यक्त करताना दोनदा विचार करावा असा सल्ला दिला.

मूळ बातमी

COMMENTS

WORDPRESS: 0
DISQUS: 0