सरकारी शाळेतील कार्यक्रमात केजरीवाल, सिसोदियांना निमंत्रण नाही

सरकारी शाळेतील कार्यक्रमात केजरीवाल, सिसोदियांना निमंत्रण नाही

नवी दिल्ली : अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प, त्यांची पत्नी मेलानिया, मुलगी इव्हान्का व जावई जेरार्ड कुशनर दोन दिवसांच्या भारतभेटीवर येत असून २५ फेब्

दिल्लीत सर्वांचे उपचार; केजरीवालांचा निर्णय बदलला
आमच्याकडे जन्मदाखला नाही- केजरीवाल
दिल्ली जळत असताना केजरीवालांकडून काय शिकायचे?

नवी दिल्ली : अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प, त्यांची पत्नी मेलानिया, मुलगी इव्हान्का व जावई जेरार्ड कुशनर दोन दिवसांच्या भारतभेटीवर येत असून २५ फेब्रुवारी रोजी दिल्लीतील सरकारी शाळेत आयोजित केलेल्या कार्यक्रमाला दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल व शिक्षणमंत्री मनीष सिसोदिया यांना निमंत्रितांच्या यादीतून वगळले आहे.

मेलानिया ट्रम्प यांना दिल्लीतल्या सरकारी शाळेतील ‘हॅपीनेस क्लास’ पाहायचा आहे आणि त्या शाळेतील विद्यार्थ्यांशी संवाद साधणार आहे. २०१८मध्ये ८ वी पर्यंतच्या विद्यार्थ्यांच्या मनावरील ओझे कमी करण्याच्या दृष्टीने ‘आप’ सरकारने ‘हॅपीनेस क्लास’ ही संकल्पना राबवली होती. या संकल्पनेत विद्यार्थ्यांना चिंतन मनन करण्यासोबत त्यांना पथनाट्ये व अन्य कार्यक्रमांत सहभाग घेण्यासाठी प्रोत्साहन दिले जाते. विद्यार्थ्यांच्या विकसनात अशा प्रयत्नातून मानसिक, शारीरिक, नैतिक कौशल्ये तयार होऊन त्यांच्या मनावरील दडपणं, ओझे कमी होते, अशा स्वरुपाचा हा शैक्षणिक प्रयोग आहे. हा प्रयोग अमेरिकेच्या फर्स्ट लेडी मेलानिया ट्रम्प यांनी पाहण्याची उत्सुकता दाखवली होती. त्यामुळे केजरीवाल व सिसोदिया हे दोन नेते मेलानिया यांच्या सोबत राहतील व ते या संकल्पनेची माहिती मेलानिया यांना देतील असे मानले जात होते.

पण शनिवारी अचानक या दोघांची नावे निमंत्रितांच्या यादीत समाविष्ट करण्यात आली नसल्याचे लक्षात आल्याने ‘आप’च्या प्रवक्त्या प्रीती मेनन यांनी तीव्र नाराजी प्रकट केली. मोदींच्या अशा क्षुद्र वर्तनाशी कोणीच बरोबरी करू शकणार नाही, असे ट्विट त्यांनी केले. त्यावर भाजपचे प्रवक्ते संबित पात्रा यांनी अमेरिकेच्या अध्यक्षांचे काय कार्यक्रम असावेत व त्यात कुणाला बोलावण्यात यावेत याची रुपरेखा भारत सरकार ठरवू शकत नाहीत. यावर राजकारण करण्याची ही वेळ नाही व त्यावर तुच्छ राजकारण करू नये, अशी प्रतिक्रिया दिली.

केजरीवाल यांना जाणूनबुजून निमंत्रण नाकारले

दिल्लीत नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकांत ‘आप’ने भाजपचा धुव्वा उडवला होता. ‘आप’ने शिक्षण व आरोग्य या मुद्द्यावर निवडणूक लढवली तर भाजपने हिंदू-मुस्लीम ध्रुवीकरणाचा मुद्दा प्राधान्याने हातात घेतला पण दिल्लीच्या मतदारांनी ‘आप’ला भरघोस मतांनी निवडून दिल्याने केजरीवाल सरकार व केंद्रातील मोदी सरकार यांच्यात पूर्वीपेक्षा अधिक तणाव निर्माण झाला आहे.

वास्तविक दिल्लीच्या सरकारी शाळांमधील प्रयोग अमेरिकेची फर्स्ट लेडी पाहणार असेल तर त्या प्रसंगी दिल्लीचे मुख्यमंत्री व शिक्षणमंत्री दोघांनी उपस्थित असणे हा योग्य शिष्टाचार ठरला असता. पण मोदी सरकारने केजरीवाल-सिसोदिया जोडगोळीला श्रेय न देण्याच्या अट्टाहासासाठी दोघांचे नाव गाळण्याचा निर्णय घेतला.

मोदी सरकार किती दुजाभाव करत आहे हेही दिसून आले. गुजरातमध्ये अहमदाबाद येथील मोटेरा स्टेडियमच्या कार्यक्रमात डोनाल्ड ट्रम्प व मोदींसोबत गुजरातचे मुख्यमंत्री विजय रुपाणी यांना निमंत्रित केले आहे तर आग्रा भेटीत उ.प्रदेशचे मुख्यमंत्री आदित्यनाथ यांना निमंत्रित करण्यात आले आहे.

मूळ बातमी

COMMENTS

WORDPRESS: 0
DISQUS: