राज्यघटनेवरची टीका भोवली; केरळच्या मंत्र्याचा राजीनामा

राज्यघटनेवरची टीका भोवली; केरळच्या मंत्र्याचा राजीनामा

तिरुवनंतपुरम/पथनमथिट्टाः भारतीय राज्यघटना सर्वसामान्य जनतेची पिळवणूक, लूट करते. ती शोषणकर्त्याला माफ करते. भारताची राज्यघटना अशा पद्धतीने लिहिण्यात आल

राज्यात मेडिकल कॉलेजमधील जागा वाढवल्या
मतदान करण्यापूर्वी टोनी जोसेफ यांचे ‘अरली इंडियन्स’ वाचा
भारतीय जीवनाशी सतत व्यवहार

तिरुवनंतपुरम/पथनमथिट्टाः भारतीय राज्यघटना सर्वसामान्य जनतेची पिळवणूक, लूट करते. ती शोषणकर्त्याला माफ करते. भारताची राज्यघटना अशा पद्धतीने लिहिण्यात आली आहे की त्यातून देशाच्या जनतेची लूट होते, अशी एकाहून एक वादग्रस्त विधाने करणारे केरळचे मत्स्यपालन मंत्री साजी चेरियन यांना बुधवारी आपल्या मंत्रिपदाचा राजीनामा द्यावा लागला.

चेरियन यांनी आपला राजीनामा मुख्यमंत्र्यांकडे सुपूर्द केला. माझी राज्यघटनेविषयीची विधाने प्रसार माध्यमातून विपर्यास्त पद्धतीने मोडून तोडून प्रसिद्ध करण्यात आली. माकप व एलडीएफ युतीला कमकुवत करण्याचे प्रसार माध्यमांचे प्रयत्न असल्याने त्यांनीच ही खोटी कहाणी रचली असे आरोप चेरियन यांनी राजीनामा दिल्यानंतर केले.

काही दिवसांपूर्वी चेरियन यांनी मल्लापल्ली नजीक एका राजकीय कार्यक्रमात भारतीय राज्यघटनेविषयी स्वैर विधाने केली होती. त्यांच्या भाषणाची चित्रफित मंगळवारी विविध प्रादेशिक वृत्तवाहिन्यांवर प्रसिद्ध झाल्याने खळबळ माजली.

आपल्या भाषणात चेरियन यांनी राज्यघटनेवर टीका केली. भारताची राज्यघटना एक उत्तम राज्यघटना असल्याचे बोलले जाते पण मला वाटते की ही राज्यघटना अशा पद्धतीने लिहिली गेली आहे की, ज्यातून सर्वसामान्य जनतेची लूट केली जात आहे, असे चेरियन म्हणाले.

चेरियन यांच्या या विधानावर बुधवारी काँग्रेसप्रणित यूडीएफने विधानसभेत जोरदार हंगामा केला. त्यानंतर हे कामकाज दिवसभरासाठी तहकूब करण्यात आले. विरोधकांनी चेरियन यांच्या राजीनाम्याची मागणीही जोरदारपणे केली.

चेरियन यांच्या समर्थनार्थ माकप व भाकप पुढे आली. या दोन्ही पक्षांनी चेरियन यांनी राज्यघटनेविषयी केलेली विधाने चुकून केली आहे, त्यांनी हेतुपुरस्सर अशी विधाने केली नाहीत, असे माकप पॉलिटब्युरोचे सदस्य एमए बेबी यांनी स्पष्टीकरण दिले. चेरियन यांच्याकडून खुलासा मागवला असल्याचेही बेबी यांनी सांगितले.

मूळ वृत्त

COMMENTS

WORDPRESS: 0
DISQUS: