जर्मनीतील खाद्यमहोत्सवातून बीफ करी मागे

जर्मनीतील खाद्यमहोत्सवातून बीफ करी मागे

नवी दिल्ली : जर्मनीतील फ्रँकफ्रट शहरात भारतीय खाद्य महोत्सवात केरळीय समाजाकडून बीफ करी व पराठा ठेवल्याचा आक्षेप उत्तर भारतातील काही हिंदू संघटनांनी घे

गुजरात काँग्रेसवर हार्दिक पटेल नाराज
बिहार विधानसभेत एनआरसीविरोधात प्रस्ताव संमत
४० टक्के कमिशनच्या आरोपावरून बोम्मई सरकार अडचणीत

नवी दिल्ली : जर्मनीतील फ्रँकफ्रट शहरात भारतीय खाद्य महोत्सवात केरळीय समाजाकडून बीफ करी व पराठा ठेवल्याचा आक्षेप उत्तर भारतातील काही हिंदू संघटनांनी घेतल्याने वाद उफाळला.

हा वाद अधिक चिघळू नये म्हणून हे दोन्ही पदार्थ मागे घ्यावेत असे भारतीय वकिलातीतून सांगण्यात आल्यानंतर हे पदार्थ मागे घेण्यात आले असे ‘केरळ समाजम फ्रँकफर्ट’ या संस्थेने सांगितले.

आमची संस्था जर्मनीतील केरळ समाजाचे प्रतिनिधित्व करते असून आमच्या समाजात जे काही खाल्ले जाते ते आम्ही आमच्या स्टॉलवर ठेवले होते. पण त्याला उजव्या विचारधारेच्या लोकांनी आक्षेप घेतला व हे प्रकरण अधिक वाढू नये म्हणून आम्ही बीफ व पराठा हे खाद्य प्रकार मागे घेतले असे ‘केरळ समाजम फ्रँकफर्ट’ने जाहीर केले.

महोत्सवातील मेन्यू

महोत्सवातील मेन्यू

३१ ऑगस्टपासून फ्रँकफर्ट येथे Indien Festया खाद्य महोत्सवास सुरुवात झाली होती. हा महोत्सव भारतीय दुतावासाकडून ठरवण्यात आल्याने जर्मनीत राहणाऱ्या भारतीय समाजाचे प्रांतिक खाद्यवैविध्य या महोत्सवात दिसावे अशी कल्पना होती. प्रत्येक प्रांतानुसार पदार्थांचे स्टॉल ठेवण्यात आले होते.

त्यानुसार ‘केरळ समाजम फ्रँकफर्ट’ संस्थेने बीफ करी व पराठा असे दोन पदार्थ ठेवले होते. त्यावर काही उत्तर भारतीय संस्थांनी आक्षेप घेत हे पदार्थ भारतीय खाद्यसंस्कृतीचे प्रतिनिधित्व करत नाही, असा आरोप केला. हे पदार्थ खाद्य महोत्सवात ठेवल्यास गोंधळ माजवण्यात येईल अशी धमकीही या संस्थांनी दिली होती. अखेर हा वाद भारतीय वकिलातीपर्यंत गेला व त्यांनी हे दोन पदार्थ मागे घेण्यास केरळ समाजमला विनंती केली.

हे प्रकरण काही वेळ जर्मन पोलिसांपर्यंतही गेले. केरळ समाजाने पोलिसांना हे प्रकरण समजून सांगण्याचा प्रयत्न केला. तेव्हा पोलिसांनी “हा भारत नाही इथे वाद घालू नका” असे त्यांना सांगितल्याचे वृत्त केरळ कौमुदी या ऑनलाईन वृत्तसंस्थेने दिले आहे.

या सगळ्या प्रकारानंतर जर्मनीतल्या मल्याळी लोकांनी उत्तर भारतीयांवर टीका करत न्यायाची मागणी केली. अनेकांनी सोशल मीडियावरूनही या घटनेचा निषेध नोंदवत उत्तर भारतीयांवर निशाणा साधला. या वादानंतर अनेक गैरसमजही सोशल मीडियावर पसरवले गेले.

मूळ बातमी

COMMENTS

WORDPRESS: 0
DISQUS: 0