कुमारस्वामींचे भविष्य आज ठरण्याची शक्यता

कुमारस्वामींचे भविष्य आज ठरण्याची शक्यता

बंगळुरू : १६ आमदारांच्या अचानक राजीनाम्याने संकटात सापडलेल्या कर्नाटकातील कुमारस्वामी सरकारला गुरुवारी दिलासा मिळाला. सरकारवरच्या विश्वासदर्शक ठरावाची

गोहत्याबंदीबाबत शेतकऱ्यांचे मौन का?
मंदिर परिसरात मुस्लिमांच्या व्यवसायबंदीवर भाजपचे २ आमदार नाराज
कर्नाटकः माध्यान्ह भोजनात अंडे-मांस न ठेवण्याची शिफारस

बंगळुरू : १६ आमदारांच्या अचानक राजीनाम्याने संकटात सापडलेल्या कर्नाटकातील कुमारस्वामी सरकारला गुरुवारी दिलासा मिळाला. सरकारवरच्या विश्वासदर्शक ठरावाची प्रक्रिया पूर्ण करा, असे लेखी पत्र कर्नाटकचे राज्यपाल वजुभाई वाला यांनी विधानसभा अध्यक्ष के. आर. रमेश यांना पाठवले. त्यानंतर रमेश कुमार यांनी सदनाचे कामकाज शुक्रवारपर्यंत स्थगित केले. के. आर. रमेश यांच्या या निर्णयाचा निषेध म्हणून भाजपच्या आमदारांनी विधानसभेच्या आवारात रात्रभर धरणे देण्याचा निर्णय घेतला आहे.

आता शुक्रवारी ११ वाजता पुन्हा अविश्वास ठरावावरचे कामकाज सुरू होईल. दरम्यान गुरुवारी सात तास अविश्वास ठरावावर चर्चा झाली. मुख्यमंत्री कुमारस्वामी यांनी बंडखोर आमदारांवर निशाणा साधत या आमदारांनी आपली प्रतिमा मलीन करून सरकार अस्थिर करण्याचा प्रयत्न केला असा आरोप केला. काँग्रेसनेही भाजपनेच आमदार फोडल्याचा आरोप केला. गुरुवारच्या कामकाजात बंडखोर आमदारांसह १९ आमदार गैरहजर राहिले होते.

COMMENTS

WORDPRESS: 0
DISQUS: 0