लखीमपुर हिंसाचारः प्रमुख आरोपीचा जामीन फेटाळला

लखीमपुर हिंसाचारः प्रमुख आरोपीचा जामीन फेटाळला

नवी दिल्लीः लखीमपुर खीरी हिंसाचार प्रकरणी केंद्रीय गृहराज्यमंत्री अजय मिश्रा यांचा मुलगा टेनी ऊर्फ आशीष मिश्रा यांचा अलाहाबाद उच्च न्यायालयाने मंजूर क

महाराष्ट्राच्या सत्तेचा चौकोन
काश्मीरचा इतिहास, भूगोलही बदलला
सत्ता व संपत्तीच्या हव्यासातून बंडखोरीचे राजकारण

नवी दिल्लीः लखीमपुर खीरी हिंसाचार प्रकरणी केंद्रीय गृहराज्यमंत्री अजय मिश्रा यांचा मुलगा टेनी ऊर्फ आशीष मिश्रा यांचा अलाहाबाद उच्च न्यायालयाने मंजूर केलेला जामीन सोमवारी सर्वोच्च न्यायालयाने रद्द केला.

सरन्यायाधीश एन. व्ही. रमणा, न्या. सूर्यकांत व न्या. हिमा कोहली यांच्या विशेष पीठाने आशीष मिश्रा यांचा जामीन अर्ज फेटाळत असताना त्यांना या आठवड्यात आत्मसमर्पण करण्यासही सांगितले. त्याच बरोबर न्यायालयाने आशीष शर्मा यांना जामीन द्यावा की नाही यावर फेरविचार करण्यासाठी हे प्रकरण पुन्हा अलाहाबाद उच्च न्यायालयाकडे पाठवले आहे.

१० फेब्रुवारी रोजी अलाहाबाद उच्च न्यायालयाने आशीष मिश्रा यांना जामीन दिल्याने या निर्णयाविरोधात पीडित कुटुंबियांनी सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. या याचिकेत पीडित कुटुंबियांनी आशिष शर्मा यांना जामीन मिळाल्यानंतर साक्षीदारांवर हल्ले झाले होते व त्यांना धमक्या देण्यात आल्या होत्या. आशीष मिश्रा जामीनावर बाहेर आहेत व आता भाजपने निवडणुकाही जिंकल्या आहेत, आम्ही तुम्हाला बघून घेऊ अशा धमक्या मिळाल्याचे पीडितांचे दावे होते.

गेल्या वर्षी ३ ऑक्टोबरला लखीमपुर खीरी येथे आंदोलक शेतकऱ्यांच्या अंगावर गाडी घालण्याचा आरोप आशिष मिश्रा यांच्यावर आहे. या घटनेत ४ शेतकरी ठार झाले होते व नंतर उसळलेल्या हिंसाचारात अन्य ४ जण मरण पावले होते.

मूळ वृत्त

 

COMMENTS

WORDPRESS: 0
DISQUS: