तिस्ता, श्रीकुमार, संजीव भट्ट यांच्यावर आरोपपत्र दाखल

तिस्ता, श्रीकुमार, संजीव भट्ट यांच्यावर आरोपपत्र दाखल

नवी दिल्लीः २००२च्या गुजरात दंगलीत खोटे पुरावे उभे करण्याच्या संदर्भात गुजरात पोलिस एसआयटीने बुधवारी सामाजिक कार्यकर्त्या तिस्ता सेटलवाड, माजी पोलिस अधिकारी आर. बी. श्रीकुमार व संजीव भट्ट यांच्याविरोधात आरोपपत्र दाखल केले. या संदर्भातील माहिती तपास अधिकारी व पोलिस उपायुक्त बी. व्ही. सोळंकी यांनी पीटीआयला दिली. माजी आयपीएस अधिकारी व वकील राहुल शर्मा यांना या प्रकरणात साक्षीदार म्हणून उभे करण्यात येणार आहे.

तिस्ता सेटलवाड, श्रीकुमार व संजीव भट्ट यांच्यावर आयपीसी ४६८, १९४ व २१८ अंतर्गत गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

गेल्या जून महिन्यात गुजरात दंगल प्रकरणात सर्वोच्च न्यायालयाने गुजरातचे तत्कालिन मुख्यमंत्री नरेंद्र मोदी, त्यांचे मंत्रिमंडळ व काही प्रशासकीय अधिकाऱ्यांना क्लीनचीट दिली होती. त्या क्लीनचीट नंतर लगेच अहमदाबाद क्राइम ब्रँचने सेटलवाड, श्रीकुमार यांच्याविरोधात बनावट पुरावे उभे केल्याच्या आरोपावरून तक्रार दाखल केली होती. या तक्रारी नंतर जून महिन्याच्या अखेरीस सेटलवाड यांना अटक करण्यात आली होती. गेल्या २ सप्टेंबरला सर्वोच्च न्यायालयाने सेटलवाड यांना हंगामी जामीन दिला होता. पण श्रीकुमार यांना जामीन नाकारला होता. तिसरे आरोपी भट्ट अन्य एका प्रकरणात तुरुंगात आहेत.

मूळ बातमी

COMMENTS