३७० कलमाच्या विरोधातील याचिकेतून नाव मागे घेण्यासाठी शाह फैजल यांचा अर्ज

३७० कलमाच्या विरोधातील याचिकेतून नाव मागे घेण्यासाठी शाह फैजल यांचा अर्ज

एप्रिलमध्ये, सरकारने फैजल यांचा राजीनामा मागे घेण्याचा अर्ज स्वीकारला आणि त्यांना पुन्हा भारतीय प्रशासकीय सेवेत रुजू केले.

उन्हाळी सुट्यानंतर ‘३७० कलम’ याचिकांची सुनावणी
सरकारविरोधात काश्मीरातील सर्व पक्ष एकवटले
काश्मीर – माणसांना जोडुया : संजय नहार

नवी दिल्ली: जम्मू-काश्मीरला विशेष दर्जा देणार्‍या घटनेतील कलम ३७० काढून टाकण्याच्या राष्ट्रपतींच्या आदेशाला आव्हान देणाऱ्या याचिकाकर्त्यांच्या यादीतून आयएएस अधिकारी शाह फैजल यांनी आपले नाव मागे घेण्याची मागणी करत सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली आहे.

जम्मू आणि काश्मीर पीपल्स मूव्हमेंट (JKPM) हा त्यांचा राजकीय पक्ष सुरू करणाऱ्या फैजलने २०१९ मध्ये सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. त्या याचिकेची २६ ऑगस्ट २०१९ रोजी नोंद करण्यात आली होती.

एप्रिलमध्ये, सरकारने राजीनामा मागे घेण्यासाठी फैजलचा अर्ज स्वीकारला आणि त्यांना पुन्हा भारतीय प्रशासकीय सेवेत रुजू केले होते.

कलम ३७० रद्द करण्याला आव्हान देणाऱ्या सात याचिकाकर्त्यांच्या यादीतून आपले नाव वगळण्याची मागणी करणारा अर्ज फैजलने यावर्षी एप्रिलमध्ये दाखल केला होता.

अन्य याचिकाकर्त्यांमध्ये जाविद अहमद भट, शेहला रशीद शोरा, इलियास लावे, सैफ अली खान आणि रोहित शर्मा आणि मोहम्मद हुसेन पदर यांचा समावेश आहे.

५ ऑगस्ट २०१९ रोजी केंद्र सरकारने जम्मू आणि काश्मीर राज्याचा विशेष दर्जा काढून टाकून त्याचे दोन केंद्रशासित प्रदेशांमध्ये विभाजन करण्याचा निर्णय घेतला होता.

COMMENTS

WORDPRESS: 0
DISQUS: 0