सर्वोच्च न्यायालयाचे नुपूर शर्मांना अटकेपासून संरक्षण

सर्वोच्च न्यायालयाचे नुपूर शर्मांना अटकेपासून संरक्षण

नवी दिल्लीः प्रेषित मोहम्मद पैगंबर यांच्याविषयी अवमानास्पद उद्गार काढल्यानंतर निलंबनाची कारवाई झालेल्या भाजपच्या प्रवक्त्या नुपूर शर्मा यांच्याविरोधात

एडवर्ड स्नोडेन रशियाचा स्थायी निवासी
व्हॉट्सअपवरील चिनी मृत सैनिकांची नावे टाइम्स नाऊवर
कृषी कायदेः शरद पवार दुटप्पी आहेत का?

नवी दिल्लीः प्रेषित मोहम्मद पैगंबर यांच्याविषयी अवमानास्पद उद्गार काढल्यानंतर निलंबनाची कारवाई झालेल्या भाजपच्या प्रवक्त्या नुपूर शर्मा यांच्याविरोधात देशभरातून जेवढ्या काही फिर्यादी झाल्या आहेत, त्यातून त्यांना अटक करू नये असे संरक्षण सर्वोच्च न्यायालयाने मंगळवारी त्यांना दिले. नुपूर शर्मा यांना कायदेशीर मार्ग मिळावेत अशी आमची इच्छा आहे त्यामुळे त्यांच्यावर कोणतीही दंडात्मक कारवाई करू नये, असे सर्वोच्च न्यायालयाच्या न्या. सूर्यकांत व न्या. पारदीवाला यांच्या पीठाने सांगितले. या पीठाने दिल्ली, प. बंगाल व महाराष्ट्र, तेलंगण राज्यांकडून १० ऑगस्टपर्यंत उत्तरही मागितले आहे.

मोहम्मद पैगंबर यांच्यावर अवमानजनक टिप्पण्णी केल्यानंतर नुपूर शर्मा यांच्याविरोधात देशभरातून ९ फिर्यादी दाखल झाल्या असून त्यांना अटक करण्यात येण्याची शक्यता वाढली आहे. या पार्श्वभूमीवर नुपूर शर्मा यांनी सर्वोच्च न्यायालयात एक याचिका दाखल करून आपल्याविरोधात दाखल झालेल्या फिर्यादीमुळे अटक होऊ नये यासाठी न्यायालयाकडून संरक्षण मागितले आहे. मंगळवारच्या सुनावणीत शर्मा यांच्या वकिलांनी आपल्या अशिलाच्या जीवाला धोका असून पाकिस्तानातून एक संशयित भारतात त्यांना ठार मारण्यासाठी आला होता, त्याला अटक करण्यात आली असून पटणा येथे अटक झालेल्यांच्या व्हॉट्स अप ग्रुपवरून नुपूर शर्मा यांचा पत्ता मारेकऱ्यांना मिळाल्याचा दावा केला. नुपूर शर्मा यांच्या जीवाला धोका असल्याने त्या देशातील अन्य न्यायालयात उपस्थित राहू शकत नाहीत. त्यांना कितीही संरक्षण दिले तरी त्यांच्या जीवाला धोका वाढत असल्याचा युक्तिवाद वकिलांनी केला. नुपूर यांच्याविरोधात प. बंगालमध्ये ४ फिर्यादी आहे, त्यांच्या जीवाला धोका आहे, त्यांना संरक्षण द्यावे. दिल्लीतही फिर्याद दाखल झाली आहे. त्यामुळे त्यांच्याविरोधात झालेल्या सर्व फिर्यादींची सुनावणी दिल्लीत व्हावी अशी मागणी शर्मा यांच्या वकिलांनी केली. दिल्ली वगळता अन्य ठिकाणच्या फिर्यांदींना स्थगिती द्यावी, एकाच प्रकरणात अनेक फिर्यादी दाखल होऊ शकत नाहीत, न्यायालयाने त्यात लक्ष घालावे असे शर्मा यांच्या वकिलांनी सांगितले.

त्यावर नुपूर शर्मा यांच्यावर दाखल झालेल्या अनेक फिर्यादी पाहता त्यांना त्यांची बाजू मांडण्यासाठी कायदेशीर पर्याय द्यायला हवेत, त्यामुळे त्यांना अटक करून नये, असे न्या. सूर्यकांत यांनी निर्देश दिले.

COMMENTS

WORDPRESS: 0
DISQUS: 0