तिस्ता सेटलवाड, श्रीकुमार यांचे जामीन अर्ज फेटाळले

तिस्ता सेटलवाड, श्रीकुमार यांचे जामीन अर्ज फेटाळले

अहमदाबादः २००२च्या गुजरात दंगलीत निष्पाप नागरिकांना गोवल्याप्रकरणात सध्या अटकेत असलेल्या सामाजिक कार्यकर्त्या पत्रकार व गुजरातचे माजी पोलिस महानिरीक्ष

स्टॅन स्वामींच्या कार्याचा आदरः मुंबई हायकोर्टाकडून स्तुती
राजीव गांधी हत्याप्रकरणातील दोषी पेरारिवलानला जामीन
चिदंबरम यांना सर्वोच्च न्यायालयाने जामीन का दिला?

अहमदाबादः २००२च्या गुजरात दंगलीत निष्पाप नागरिकांना गोवल्याप्रकरणात सध्या अटकेत असलेल्या सामाजिक कार्यकर्त्या पत्रकार व गुजरातचे माजी पोलिस महानिरीक्षक आर. बी. श्रीकुमार यांना अहमदाबाद येथील सत्र न्यायालयाने शनिवारी जामीन नाकारला. अतिरिक्त मुख्य न्यायाधीश डी. डी. ठक्कर यांनी या दोघांचे जामीन अर्ज फेटाळले.

तिस्ता सेटलवाड व श्रीकुमार यांच्यावर गुजरात पोलिसांनी आयपीसीतील कलम ४६८ (फसवणूक) व १९४ ( खोटे पुरावे देणे) अंतर्गत गुन्हे दाखल केले असून त्यांना अटक केली आहे. या प्रकरणाची चौकशी करणाऱ्या गुजरात पोलिसांच्या विशेष तपास पथकाने (एसआयटी) आपल्या आरोपपत्रात २००२ गुजरातमध्ये नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली भाजपचे सरकार असताना हे सरकार पाडण्यासाठी काँग्रेसचे दिवंगत ज्येष्ठ नेते अहमद पटेल यांना साथ दिली व कटकारस्थानात मदत केली असा आरोप ठेवला आहे.

२००२ मध्ये गोधरा ट्रेन जळीत हत्याकांड झाल्यानंतर अहमद पटेल यांनी लगेच सेटलवाड यांना ३० लाख रु.दिले होते. तर श्रीकुमार हे गुजरात पोलिस खात्यातले एक नाराज अधिकारी होते. त्यांनी नाराजीतून गुजरातमधील लोकप्रतिनिधी, नोकरशाही व पोलिस खात्याला हाताशी धरून सरकारची बदनामी सुरू केल्याचा ठपका गुजरात एसआयटीच्या आरोपपत्रात ठेवण्यात आला आहे.

गुजरात दंगलीत निरपराधांना गोवण्याच्या आरोपावरून तिस्ता सेटलवाड, श्रीकुमार व संजीव भट्ट यांना एसआयटीने गोवले होते. त्यानंतर २००२मध्ये गुजरातमधील तत्कालिन मोदी सरकार पाडण्याच्या कटकारस्थानात तिस्ता सेटलवाड, अहमद पटेल यांच्यासोबत होत्या, असे पोलिसांचे म्हणणे आहे. सरकार पाडण्यासाठी तिस्ता सेटलवाड यांना काँग्रेसकडून मोठ्या प्रमाणात आर्थिक निधी व अन्य मदत मिळाली, असे पोलिसांचे म्हणणे आहे. गुजरात पोलिसांनी या संदर्भात दोन जणांचा जबाबही नोंदवला आहे. यातील एका जबाबात तिस्ता सेटलवाड यांना अहमद पटेल यांच्याकडून ३० लाख रु. मिळाले असा दावा करण्यात आला आहे.

२००२च्या गोध्रा दंगलीनंतर सेटलवाड या दिल्लीतील अनेक प्रभावशाली राजकीय नेत्यांच्या भेटीगाठी घेत होत्या. यातून गुजरात दंगलीत भाजपच्या बड्या नेत्यांची नावे गोवावीत असे त्यांना सांगण्यात येत होते. सेटलवाड दिल्लीतील शाहीबाग सर्किट हाऊस येथे नेत्यांच्या भेटी घेत होत्या, त्यात एक बैठक अहमद पटेल यांच्यासोबत झाली होती, असे पोलिसांनी आरोपपत्रात म्हटले आहे. एक बैठक अहमद पटेल यांच्या घरी झाली होती त्यात संजीव भट्ट आले होते, असाही पोलिसांचा दावा आहे.

COMMENTS

WORDPRESS: 0
DISQUS: 0