लव जिहादच्या अफवेमुळे मुस्लिम जोडप्याचे लग्न रोखले

लव जिहादच्या अफवेमुळे मुस्लिम जोडप्याचे लग्न रोखले

नवी दिल्लीः वादग्रस्त धर्मांतर कायद्याचा दुरुपयोग उ. प्रदेशात दोन दिवसांपूर्वी दिसून आला. राज्यातल्या कुशीनगर जिल्ह्यात कसया गावात एका मुस्लिम पुरुष व

मुंबई पोलिसांच्या बदनामीसाठी ८० हजार फेक अकाउंट
जागतिक तापमानवाढ आणि फॅसिझमचा फास
एनएसएसच्या सर्वेक्षणातून दिसत आहे शेतकऱ्यांची स्थिती

नवी दिल्लीः वादग्रस्त धर्मांतर कायद्याचा दुरुपयोग उ. प्रदेशात दोन दिवसांपूर्वी दिसून आला. राज्यातल्या कुशीनगर जिल्ह्यात कसया गावात एका मुस्लिम पुरुष व मुस्लिम महिलेचा विवाह लव जिहाद असल्याच्या संशयावरून पोलिसांनी रोखला आणि पोलिसांनी रात्रभर नवरा व नवरीला पोलिस कोठडीत ठेवले आणि त्यांची चौकशी केली. चौकशीनंतर दोघेही एकाच धर्माचे असल्याचे निष्पन्न झाले.

८ डिसेंबरला नवरा हैदर व नवरी शबीला यांचे लग्न होणार असल्याच्या निमित्ताने एका कार्यक्रमाचे आयोजन केले गेले होते. हा कार्यक्रम सुरू असतानाच संध्याकाळी पोलिसांना गावातल्या काही गुंडांनी फोन केला आणि गावात एक मुस्लिम युवक हिंदु मुलीचे धर्मांतर करून लग्न करत असल्याचे त्यांनी पोलिस ठाण्याचे प्रमुख संजय कुमार यांना सांगितले.

पोलिसांनी या फोनवर विश्वास ठेवून घटनास्थळी धाव घेतली व हा कार्यक्रम बंद करून हैदर व शबीला यांना ताब्यात घेतले. ही घटना घडल्यानंतर शबीला याच्या भावाने आम्हाला या लग्नासंदर्भात कोणतीही तक्रार नाही, दोघांची संमती व दोघांच्या घरच्यांची संमती असल्यानंतर हे लग्न होत असल्याचे सांगितल्यानंतर पोलिसांनी या दोघांना कोठडीतून सोडले.

पण पोलिसांनी आपल्याला व शबीलाला बेदम मारले असा आरोप हैदरने केला. पोलिसांनी माहिती घेताना शबीलाचे आधार कार्ड मागितले व ती मुस्लिम असल्याची खात्री करून घेतली, त्यानंतर त्यांच्या वर्तनात बदल झाला व ते सभ्यपणाने वागू लागले असे हैदरने सांगितले. पण पोलिसांनी हे सर्व आरोप फेटाळत या लग्नाबद्दल माहिती घेतल्यानंतर लगेचच हे प्रकरण सोडवले असे कुशीनगर जिल्हा पोलिस प्रमुख विनोद कुमार सिंग यांनी सांगितले.

हैदर अली याच्या पहिल्या पत्नीचे निधन १० वर्षांपूर्वी झाले होते व तो आझमगडमध्ये केशकर्तनालयाच्या दुकानात काम करतो. त्याने दुसरे लग्न करण्यासाठी एक स्थानिक सामाजिक कार्यकर्ते अरमान खान यांच्याशी संपर्क साधला होता. लग्न होण्याच्या एक आठवड्यापूर्वी शबीला आझमगडमधील आपल्या घरातून बाहेर पडली व ती हैदरच्या घरी राहू लागली. या दोघांचे लग्न होणार असल्याची माहिती मिळाल्यानंतर हिंदू युवा वाहिनीचे काही कार्यकर्ते त्यांच्या घरी आले व दोघांची चौकशी केली होती.

पोलिसांनी या प्रकरणी अद्याप कोणालाही अटक केलेली नाही.

मूळ बातमी

COMMENTS

WORDPRESS: 0
DISQUS: 0