महाविकास आघाडीचा दावा सादर

महाविकास आघाडीचा दावा सादर

राष्ट्रवादी काँग्रेस-शिवसेना आणि काँग्रेस या तीन पक्षांच्या महाविकास आघाडीने आज राज्यपाल कार्यालयामध्ये बहुमत असल्याचे पत्र सादर करून सरकार स्थापन करण

मोदींच्या ‘विश्वनाथ कोरिडॉर’मुळे काशीचा आत्मा कोंडला जातोय
भाजपात उडी मारलेल्या १९ पैकी १३ आमदारांचा पराभव
यूएपीएतील दुरुस्तीचे दस्तावेज देण्यास गृहखात्याचा नकार

राष्ट्रवादी काँग्रेस-शिवसेना आणि काँग्रेस या तीन पक्षांच्या महाविकास आघाडीने आज राज्यपाल कार्यालयामध्ये बहुमत असल्याचे पत्र सादर करून सरकार स्थापन करण्यासाठी पाचारण करावे, असे औपचारिक पत्र सादर केले.

राष्ट्रवादी काँग्रेस विधिमंडळ पक्षाचे नेते जयंत पाटील, शिवसेनेच्या विधिमंडळ पक्षाचे गटनेते एकनाथ शिंदे आणि काँग्रेसचे प्रदेश अध्यक्ष बाळासाहेब थोरात यांनी संयुक्तपणे राज्यपाल कार्यालयामध्ये जाऊन पत्र दिले.

“आम्ही आत्ताच राज्यपालांना भेटून त्याना १६२ आमदारांच्या सह्यांचे पत्र सादर केले आहे. भाजपने पूर्वी बहुमत नसल्याचे सांगितले होते. आत्ताही त्यांच्याकडे बहुमत नाही, असे राष्ट्रवादीचे विधिमंडळ पक्षनेते जयंत पाटील यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले.”

शिवसेनेने ११ नोव्हेंबरला राज्यपालांना भेटून अजून अवधी द्यावा अशी विनंती केली होती. दोन पक्षांशी बोलणी सुरु आहेत, असे सांगितले होते. पण राज्यपालांनी मुदत नाकारली, हा लोकशाहीचा खून आहे, असे शिवसेनेचे गटनेते एकनाथ शिंदे यांनी मुंबईत पत्रकारांशी बोलताना सांगितले. आता आमच्याकडे १६२ आमदारांचे बहुमत आहे. देवेंद्र फडणवीस यांनी तातडीने राजीनामा द्यावा, असे शिंदे म्हणाले.

दरम्यान सोनिया गांधी यांच्या नेतृत्त्वाखाली काँग्रेसतर्फे संसद परिसरामध्ये महात्मा गांधी पुतळ्यासमोर निदर्शने करण्यात आली. महाराष्ट्रामध्ये लोकशाहीचा खून करण्यात येत असल्याचा काँग्रेसने आरोप केला.

महाराष्ट्रामध्ये लोकशाहीचा खून करण्यात आल्याचे, काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी लोकसभेत प्रश्नोत्तराच्या तासामध्ये सांगितले.

COMMENTS

WORDPRESS: 0
DISQUS: 0