महाराष्ट्रात लसीकरण अडचणीत

महाराष्ट्रात लसीकरण अडचणीत

महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यांमध्ये कोरोना लसीचा तुटवडा जाणवू लागला असून, काही ठिकाणी तर एकही डोस शिल्लक नाही. त्यामुळे लसीकरण पूर्णपणे थांबले आहे. काही जिल्ह्यांमध्ये दोन ते तीन दिवस पुरेल एवढाच साठा शिल्लक आहे.

गतवैभवाच्या ‘उलट्या’ खुणा
‘स्वतःमध्ये बदल करण्याची काँग्रेसची इच्छा नाही’
आझाद यांच्या राजीनाम्याचा भाजपला किती फायदा?

महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यांमध्ये कोरोना लसीचा तुटवडा जाणवू लागला असून, काही ठिकाणी तर एकही डोस शिल्लक नाही. त्यामुळे लसीकरण पूर्णपणे थांबले आहे. काही जिल्ह्यांमध्ये दोन ते तीन दिवस पुरेल एवढाच साठा शिल्लक आहे.

महाराष्ट्रात केवळ तीन दिवस पुरेल एवढाच कोरोना लसींचा साठा शिल्लक असून केंद्राने लवकरात लवकर लस पुरवठा करावा, अशी मागणी राज्याचे आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी केली आहे.

मुंबईसह अनेक ठिकाणी लस देण्याचे काम थांबले आहे. बांद्रा-कुर्ला येथील मोठ्या लसीकरण केंद्रातील लसींचा साठा संपला आहे. याठिकाणी प्रत्येक दिवशी पाच हजार लोकांना लस दिली जाते, मात्र आज २०० पेक्षा कमी जणांना लस देण्यात आली. माहिम येथील केंद्रातील साठा संपला आहे. मुंबईमध्ये ७० पेक्षा जास्त केंद्रांवर लसीकरण थांबले आहे.

चंद्रपूर जिल्ह्यात ३१ केंद्रांवर लसीकरण थांबले आहे. जिल्ह्यातील ९६ पैकी ६५ केंद्रांवर अजून लसीकरण सुरू आहे. ठिकठिकाणी लसीकरण केंद्रांवर लसीकरण बंदचे फलक लावण्यात आले आहेत.

नवी मुंबई मध्ये दिवसाला ८ हजार लोकांना लस दिली जाते. शहरातील ४० ठिकाणी लसीकरण केंद्र असून लस उपलब्ध नसल्याने केंद्र बंद करण्याची वेळ आली आहे. पनवेल महानगर पालिकेकडेही लस उपलब्ध नसल्याने लसीकरण बंद पडले आहेत.

सातारा जिल्ह्यातही लसीचा एकही डोस शिल्लक नाही. दिवसाला २५ ते ३० हजार व्यक्तींना जिल्ह्यात दररोज सध्या लस दिली जात होती. सांगली जिल्ह्यातील संपूर्ण लसीकरण दोन दिवसांपासून बंद आहे.

परराज्यातही लस तुटवडा

महाराष्ट्रातच नव्हे तर, ओरिसा, उत्तर प्रदेशातील नोएडा या ठिकाणीही लस पुरवठा संपल्याने लसीकरण थांबविण्यात आले असून, लस पुरवठा संपल्याचे फलक केंद्रांच्या बाहेर लावण्यात आले आहेत.

करोना लसीच्या निर्मितीसाठी लागणाऱ्या कच्च्या मालाचा तुटवडा जाणवू लागल्याचे कोविशिल्ड या करोना लसीचं उत्पादन करणाऱ्या सीरम इन्स्टिट्युटचे संचालक आदर पुनावाला यांनी ‘इंडिया टुडे’ला  माहिती दिली आहे.

“अमेरिका आणि युरोपमधून करोना लसीसाठी लागणारा कच्चा माल येतो. मात्र, त्यांनी त्याचा पुरवठा थांबवल्यामुळे सीरम इन्स्टिट्युटला कच्चा माल मिळवताना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे”, असे आदर पुनावाला यांनी ‘इंडिया टुडे’ला सांगितले.

“आम्हाला लसीसाठी महत्त्वाचा असलेला कच्चा माल आत्ता हवा आहे. ६ महिने किंवा वर्षभरानंतर आम्हाला त्याची आवश्यकता नसेल. कारण तोपर्यंत आम्ही दुसऱ्या पुरवठादाराकडून तो माल मिळवण्याची व्यवस्था केली असेल. पण आत्ता या घडीला आम्हाला अमेरिका आणि युरोपकडून येणाऱ्या कच्च्या मालाची आवश्यकता आहे”, असे पूनावाला यांनी सांगितले.

सीरम इन्स्टिट्युटतर्फे अस्ट्राझेनका आणि ऑक्सफर्ड यांच्याबरोबर संयुक्तपणे कोव्हीशिल्ड या लासईचे उत्पादन केले जाते. सध्या दर महिन्याला साडेसहा कोटी डोसचे उत्पादन सीरमच्या पुण्यातील प्रकल्पामध्ये केले जाते. ही संख्या जूनपर्यंत १० ते ११ कोटींपर्यंत नेण्याचे उद्दीष्ट असल्याचे पूनावाला यांनी सांगितले.

लस राजकारण

महाराष्ट्रामध्ये लशींचा पुरवठा होत नसल्याचे राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना सांगितले. त्यानंतर राज्यामध्ये राजकारण सुरू झाले आहे. भारतीय जनता पक्षाचे केंद्रातील मंत्री प्रकाश जावडेकर, केंद्रीय आरोग्यमंत्री हर्षवर्धन यांनी महाराष्ट्र सरकारवर कोरोना परिस्थिती नीट हाताळत नसल्याचा आरोप केला. केंद्राकडून राज्याला लस पुरवठा व्यवस्थित होत असल्याचे जावडेकर यांनी दिल्लीमध्ये सांगितले. भाजपचे राज्यातील नेते देवेंद्र फडणवीस यांनीही महाराष्ट्र सरकारला पुरवठा नीट होत असल्याचे म्हंटले आहे. शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी भाजपवर आरोप करताना हे अमानुष राजकारण असल्याचे म्हंटले आहे.

COMMENTS

WORDPRESS: 0
DISQUS: 0